प्रतिनिधि सैय्यद जहीर
Lonarnews:कर्जबाजारी असल्याने ट्रक लुटण्याच्या उद्देशाने त्याने ट्रक चालकाचा खून केला. ट्रकचालकाचा मृतदेह ट्रक मधील टूल बॉक्स मध्ये टाकला. अन् ट्रक घेऊन ट्रकमधील सामान विकण्याच्या उद्देशाने तो सुसाट निघाला.. मात्र एवढ्या धावपळीत देखील त्याचे प्रेयसी सोबत बोलणे सुरू होते. अशातच त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला..
म्हणून त्याने खून केलेल्या ट्रक चालकाच्या फोनवरून प्रेयसी सोबत गप्पा मारल्या.. आता प्रेयसी सोबत मारलेल्या गप्पांवरूनच छत्रपती संभाजीनगरात या बड्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे… ट्रक चालकाचा खून करणारा हा तरुण लोणार तालुक्यातील सुलतानपूरचा राहणार असून त्याचे नाव गणेश वसंता पवार असे आहे.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याचे दोन साथीदार गणेश गजानन कुटे (सुलतानपुर) आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ (रा. गायखेडा, ता.लोणार) यांना देखील अटक केली आहे…
विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगांव, अहिल्यानगर) असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. छत्रपती संभाजी नगर मधील आडगांव बुद्रूक मध्ये सोलापूर धुळे महामार्गावर एक ट्रक बेवारस अवस्थेमध्ये आढळला होता. पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकच्या टूल बॉक्समध्ये राऊत यांचा मृतदेह आढळला. मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या.
त्यामुळे ट्रकचालकाचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. ट्रक मध्येच पोलिसांना राऊत यांचा मोबाईल देखील सापडला. या मोबाईल वरून एकाच व्यक्तीला ११ कॉल गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या खोलात गेल्यानंतर पोलिसांनी सुलतानपूरच्या गणेश पवार याला अटक केली. आधी उडवा उडवी ची उत्तरे देणाऱ्या गणेशने नंतर मात्र खुनाची कबुली दिली…
नेमके काय घडले…
छत्तीसगडमधील रायपूर मध्ये विजय राऊत यांनी ट्रक मध्ये अडीच हजार लोखंड भरले. ते घेऊन ते अहिल्यानगरला येणार होते. रायपूरमध्येच बदली चालक म्हणून काम करणाऱ्या गणेश पवारने विजय राऊत यांना मेहकर पर्यंत सोडण्याची विनंती केली.
१९ जानेवारीला ते रायपूर मधून निघाले. सोमवारी सकाळी १० वाजता विजय राऊत आणि गणेश पवार यांनी कारंजा मध्ये नाष्टा केला. त्यानंतर स्वतः गणेश पवारने ट्रकचे स्टेरिंग हाती घेत विजय राऊत यांना आराम करायला सांगितले. विजय राऊत झोपेत असतानाच गणेश पवारने टॉमी ने डोके ठेचून राऊत यांची हत्या केली. गणेश ट्रक घेऊन मेहकर जवळ आला, तिथे त्याचे मित्र घायाळ आणि कुटे त्याला मिळाले. मेहकरमध्येच त्यांनी ३० हजारात ३० क्विंटल सळ्या विकल्या. त्यानंतर तिघेही ट्रक घेऊन जालन्याच्या दिशेने निघाले. जालन्यात त्यांना खरेदीदार मिळाला नाही. म्हणून ते छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने निघाली..
ट्रक मध्ये सुटली दुर्गंधी…
दरम्यान तोपर्यंत विजय राऊत यांची हत्या करून बराच काळ झाल्यामुळे ट्रक मध्ये दुर्गंधी सुटली. ट्रक मध्ये रूम फ्रेशनर मारत ते संभाजीनगर कडे निघाले. मात्र ट्रक मधील मालाला खरेदीदार मिळत नसल्याने ट्रक रस्त्यात सोडून तिघेही गावाकडे निघून गेले…
: असा अडकला जाळ्यात…
विजय राऊत यांची हत्या करणारा गणेश पवार हा ट्रकवर बदली चालक म्हणून काम करतो. तो कर्जबाजारी आहे. राऊत आणि गणेश पवार यांची कामानिमित्ताने अनेकदा भेट होत असते. १९ जानेवारीला रायपूरमध्ये दोघांची भेट झाली. राऊत यांना अडीच हजार किलो लोखंडाच्या ट्रान्सपोर्ट चे काम मिळाल्याचे गणेशने पाहिले.
Lonarnews:तेव्हाच त्यांनी या लोखंडावर डल्ला मारण्याचा कट रचला. त्यासाठीच त्याने राऊत यांची हत्या केली.. मात्र गणेश पवार हा त्याच्या लफडेबाज स्वभावामुळेच अडकला.. प्रवासात गणेश पवार चा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. त्यामुळे त्याने राऊत यांच्या फोनवरून प्रेयसीला ११ कॉल केले. पोलीस तपासात ही बाब समोर आल्यानंतर गणेशचा कारनामा समोर आला. शिवाय टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये देखील गणेश हा राऊत यांच्यासोबत असल्याचे कैद झाले होते..