Gram panchayat /सात पैकी पाच् ग्रामपंचायतीनवर विजय मिळवित समुद्रपूर तालुक्यात महाविकास आघाडी अव्वल

 

प्रमोद जुमडे /वर्धा

समुद्रपूर:- समुद्रपूर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सात पैकी पाच ग्रामपंचायतीवर विजय संपदिती करित महाविकास आघाडीची सत्ता स्थापित झाली असून येणाऱ्या पुढच्या निवडणुकित जनतेचे मत महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत आहे.

आत्ताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या फरकाने भाजपाला महाविकास आघाडीने पराभूत केले आहे. उब्दा येथे सरपंचाची अतिथीटीची लढत होती तिथे भाजपाचे दिग्गज नेत्यांना पराभूत करून राष्ट्रवादीला यश मिळाले आहे

. त्याच पद्धतीने जाम ला यश मिळाले आहे. जाम ला भाजपाचे मोठे मोठे नेते ग्रामपंचायत रिंगणात उतरले होते पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला कारण की जनतेच्या कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. सिलेंडर, पेट्रोल महागाई विरोधात समस्त जनता चिडलेली आहे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चिडलेला आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव हा कमी असून त्यामुळे शेतकरी चिडलेला आहे. समुद्रपुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेतकरी जन आक्रोश मोर्चा चार महिण्याआधी निघाला होता या मोर्चाचे नेतृत्व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते त्याचे परिवर्तन आज जनतेच्या मताने ग्रामपंचायत निवडणुकीत मिळाले आहे.

आगामी येणाऱ्या निवडणुका लोकसभा असो की विधानसभा जो जनतेच्या कौल राहणार आहे तो आमच्याच महाविकास आघाडीच्या बाजूने राहणार आहे. कारण की भारतीय जनता पार्टी पासून जनता त्रस्त झालेली आहे सर्वसाधारण शेतकऱ्यावर सुद्धा हा सत्तेदारी पक्ष अन्याय करीत आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढ देत नसून येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या कौल महाविकास आघाडीच्या बाजूला राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूकित समुद्रपूर तालुक्यात सात पैकी पाच ग्रामपंचायतीवर जनतेने आम्हाला स्वीकारले आहे. बर्फा, वाघेडा, उब्दा, जाम व नन्दंपुर येथे महाविकास आघाडीची सत्ता स्थापित झाली आहे / Gram panchayat

Leave a Comment