Wardha / गिमाटेक्स इंडस्ट्रीज कामगार/कर्मचारी पतसंस्थेवर कोठारी-तिमांडे-आफताब खान गटाच्या कामगार आघाडीचा दणदणीत विजय १५पैकी १२ जागा जिंकत एकहाती सत्ता

 

हिंगणघाट :- काल दिनांक १० नोव्हेंबर २०२३ला पार पडलेल्या गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कामगार/कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित हिंगणघाट व वणी युनिट या पतसंस्थेवर कामगार नेते अँड. सुधिरबाबु कोठारी-राजुभाऊ तिमांडे-आफताब खान यांचे गटाच्या कामगार आघाडीने दणदणीत विजय संपादन केला. आणि एकुण १३२५ सभासद असलेल्या पतसंस्थेमधील १५ जागेपैकी १२ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली.

विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण मतदार संघातील आशिष हरबुडे ५६६ मते, दिगांबर नवघरे ४५७ मते,बंडु काटवले ४६२ मते, संजय भोयर ४८१ मते, योगेश बुरीले ४१५ मते,विनोद गोटे ४७७ मते,मोहन रघाटाटे ४२० मते , सचिन शेंडे ४२९ मते, आरक्षित मतदारसंघातील संतोष माथनकर ६७४ मते, महेंद्र चहाणकर ६३१मते, व महिला

मतदार संघातील रेश्मा बेले ६५८ मते,विद्या राऊत ५९२ मते व अपक्ष उमेदवार शाकीरखान सुबेदारखान पठाण यांनी ५२२ मते घेत विजय संपादन केला. या पतसंस्थेने मार्च २०२३पर्यत ०४ करोड ५६ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असुन या पतसंस्थेद्वारा सर्वात कमी व्याजदरावर म्हणजे ८% व्याजदराने एक लाख रुपयांपर्यत सभासदांना कर्जपुरवठा करण्यात येतो.

तसेच सभासदांना ९,% दराने वार्षिक लाभांश देण्यात येते. या पतसंस्थेद्वारा सभासदाचे निधन झाल्यास घरच्यांना १०,०००/-रुपये सानुग्रह देणे यासारख्या विविध योजना राबविण्यात येत आहे.

निवडणूक निकालानंतर झालेल्या विजयी सभेत बोलतांना अँड सुधिरबाबु कोठारी, राजुभाऊ तिमांडे व आफताबभाई खान यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व ह्या पतसंस्थेला उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेण्यासाठी, कामगारांच्या सर्वंकष विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

पतसंस्थेच्या निवडणुकीत विजय संपादन करण्यात प्रामुख्याने राहुल जाधव,जीवन दलाल,दिपक जाधव, दिनेश चौधरी, अविनाश महाकाळकर, सिद्धार्थ खोब्रागडे, उमेश इंगोले,पुर्निश चंदनखेडे, राकेश देवगिरीकर, धनराज जिकार, आनंद थुल, दीपक भोंडे, देविदास धोटे, पुंडलिक जवादे,अरुण धोटे, संजय उचकलवार, मारोती घुसे,विनोद ताजणे, देविदास कुबडे,शरद कोडापे,उपाली तेलंग, प्रविण पुरी,

मेघश्याम खोड, गजानन चामचोर,वसंता तुमडे, शंकर डंभारे, प्रविण शंभरकर, संदिप नेव्हारे, संदिप नगराळे, मनोज नगराळे, राजेश डफ, स्वप्नील कोठेवार,मनोज तांबे,अल्पेश बेहरे, विठ्ठल माळोदे, संगीता रामटेके, संगीता बोरेकर,विनोद महाजन, हेमंत मडावी,भारत खेकडे, प्रभाकर देवतळे,गजु धोटे,चंदु गुरनुले, सुनील बलखंडे, दिवाकर

घावटकर, अविनाश थुल, शशिकांत पाटील, दिवाकर घोटेकर, संदिप भजभुजे, अनिल फुसाटे, कमलाकर भजभुजे,अतुल गाठे, सचिन चिंचोलकर, प्रशांत फुसे, प्रशांत इचवे,कैलास वैरागडे, महेश बोकारे,संदिप वडतकर, धनराज भुजाडे, सुभाष बानमारे, राजेंद्र गाठे, प्रशांत ठाकरे, अरविंद ठाकरे, योगेश टेंभुरकर, अतुल फुसे, सुरेंद्र वानखेडे,बबलु माळवी,हरी रोगे, योगेश काळे, विलास भुते, दिनेश कुडे इत्यादी कामगार सदस्यांनी अत्यंत परिश्रम घेतले. Wardha

Leave a Comment