आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील घटनेचा निषेध(Hingnghat)

0
1

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- आंबेडकरी विविध सामाजिक संघटना हिंगणघाट तर्फे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ असलेले भारतीय संविधानाला काढून त्याला दगडाने फोडण्यात आले आहे.

त्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज उपविभागीय कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

1)परभणी येथील घडलेल्याअसामाजिक तत्त्वाकडून भारतीय संविधानाला दगडाने फोडून संविधानाचा अपमान करण्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे याचा सखोल तपास त्वरित करण्यात यावा (2) परभणी येथील भारतीय संविधानाला काढून दगडाने फोडण्यात आले.

त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध करण्यासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत होते परंतु प्रशासनाने आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ते गुन्हे त्वरित मागे घ्यावे व त्यांना मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना अनिल मून विक्रांत भगत विपुल थूल मनोज वासेकर अक्षय ब्राह्मणे सुरेश गायकवाड श्याम कांबळे निलेश गायकवाड अंकुर शेंडे स्नेहल जंगले निखिल जवादे सतीश कांबळे सोनू नंदागवळी प्रवीण जनबंधू नंदू बनसोड मिथुन धाबर्डे व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here