प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट:-राष्ट्रीय महामार्ग ३२२ हिंगणघाट – नंदोरी रोडवरिल भाकऱ्या नाल्यालगत अशोक बोरकर यांच्या अपघात होऊन जागीच मृत्यू झाला.या रस्त्याच्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व मुलगा विनोद बोरकर यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ३२२ हिंगणघाट- नंदोरी रोड व्यवस्थित नसल्यामुळे अशोक बोरकर यांचा अपघात झाला व यांच्या जागीच मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व त्यांच्या मुलांनी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार केली असून या रोड च्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. कंत्राटदाराचे नियोजन बरोबर नसल्यामुळे अशोक बोरकर यांच्या मृत्यू झाला. या आधीपन असे अनेक अपघात याच ठिकाणी झाले आहे. व त्यात त्यांच्या मृत्यू देखील झाला आहे.
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
हिंगणघाट नंदोरी रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे असून त्या कामाचे नियोजन सुद्धा बरोबर नाही. या भागातील जनतेला या रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून नागरिक संतापले आहे.
Hingnghat :राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी पुढाकार घेऊन हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. जर जनतेला त्रास होत आहे. व कामाचे नियोजन नाही आहे.म्हणून या रस्त्यांच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.