ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालयात सृजन वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव संपन्न( Hingnghat )

0
6

 

प्रतिनिधी सचिन वाघे :-

Hingnghat:ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट येथे सृजन वार्षिक स्नेहसंमेलन संस्थापक गिरधर राठी, अध्यक्ष अर्पणा राठी, सचिव श रशेश राठी, कोषाध्यक्ष प्रवीण धोबे, मुख्याध्यापक अभिनव जयस्वाल मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या महोत्सवात 25 डिसेंबर 2024 व 26 डिसेंबर 2024 रोजी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शितल ताई शेगोकार (shegaonnews)

या दिवशी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून महोत्सवाचे उद्घघाटन करण्यात आले सरस्वती स्तवनाने व स्वागत नृत्यने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात प्री- प्रायमरी तसेच पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याचे जोरदार सादरीकरण केले.

शैक्षणिक कार्यक्रमात पावर पॉइंट प्रेझेंटेशन तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा मंचावर घेण्यात आली. या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले सर्वधर्मसमभाव व शूरवीर सैनिक नाटिका, शृंगार रसाने परिपूर्ण लावणी, तानाजी मालुसरे यांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडवणारे वीर रसात्मक नृत्य, मुलींचा आत्मविश्वास वाढवणारे नारी शक्ती नृत्य, विविध राज्यातील नृत्य प्रकाराचे दर्शन घडवणारे व सामाजिक जागृती, विज्ञान निष्ठा वाढवणारे नृत्य हे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.

सोहळ्याचे सूत्रसंचालन स्वतः विद्यार्थ्यांनी केले. प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्यांच्या गजराने विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाला दाद दिली.’वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो.

Hingnghat:त्याने विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्यवाला वाव मिळतो. नेतृत्व गुण केवळ राजकीय क्षेत्रातच उपयोगी पडतात असे नाही तर व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातही त्याचा चांगला उपयोग होतो असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गिरधर राठी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here