हा माझा सत्कार नसून जिल्ह्यातील समस्त नागरिकांचा सत्कार आहे -: ना.पकंज भोयर(Hingnghat)

 

वर्धा जिल्हाला मंत्रीपद मिळाले हा आपला बहुमान -: आमदार समीर कुणावार* प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट :- भारतीय जनता पार्टी हिंगणघाट तथा नागरी सत्कार समितीच्या वतीने माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे नवनियुक्त राज्यमंत्री ना.श्री. पंकज भोयर व नवनिर्वाचित आमदार राजेश बकाणे व सुमीत वानखेडे यांचा नागरी सत्कार समारंभ स्थानिक निखाडे भवन हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आला होता या नागरी सत्कार समितीचे स्वागताध्यक्ष आमदार समीर कुणावार हे होते त्याच्याच पुढाकाराने सदर सत्कार सोहळा आयोजित केला केला होता

यावेळी सत्काराला उत्तर देताना ना.भोयर यांनी हा सत्कार माझा नसून जिल्ह्यातील समस्त नागरिकांचा हा सत्कार असल्याची भावनिक प्रतिक्रिया दिली मंत्रीपदामुळे आधीपेक्षा माझी जवाबदारी वाढली

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट येथे “तेजस” – द्विवार्षिक क्रीडा दिनाचा भव्य सोहळा संपन्न(Hingnghat)

असून माजी खासदार रामदास तडस,आमदार समीर कुणावार,आमदार राजेश बकाणे व सुमीत वानखेडे , जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या साथीने जिल्हाला विकासकांच्या वेगळ्या उंचीवर नेण्याच्या माझा मानस असल्याची प्रतिक्रिया दिली आमदार बकाणे व वानखेडे यांची सुध्दा समायोजित भाषणें झालीत.

स्वागताध्यक्ष कुणावार यांनी ना.भोयर यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला प्रथमच जिल्ह्याला मंत्रीपद मिळाल्याने हा संपूर्ण जिल्ह्याचा बहुमान असून प्रथमच जिल्ह्यातील चारही विधानसभा काबीज केल्याने आम्हा सर्व भाजप कार्यकर्त्यांना याचा अभिमान असल्याची भावना व्यक्त केली याप्रसंगी मंचावर हिंगणघाट समुद्रपूर सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Hingnghat :यावेळी हिंगणघाट येथील सामाजिक संस्थांनी मान्यवराचा सत्कार केला कार्यक्रमाला सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Comment