जस्तगाव फाटा १०चाकी टिप्पर व दुचाकी वाहन अपघात प्रकरणी वाहन चालकास अटक व जमानतनवर सुटका.(Policenews)

 

Policenews:संग्रामपूर ः- शेगाव -वरवट(बकाल ) रोडवरील जस्तगाव फाट्याजवळ दि.१७/जानेवारी रोजी दहा चाकी मालवाहतूक टिप्पर व दुचाकी वाहनास जबर धडक दिल्याने दोन मजूरांचा मृत्यू तर एक गंभीर झाल्या प्रकरणी टिप्पर जड वाहन चालकास तामगाव पोलीसांनी अटक करुन जमानतवर सोडण्यात आले आले आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,मृतकाचे नातेवाईक यांनी तामगाव पो.स्टे,ला घटनेच्या दिवशी रात् ७.४५. वा दरम्यान तोंडी फिर्याद दिली की दि.१७/जानेवारी रोजी ११.४५वा.संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव फाट्यावर अपघात घडला त्यात वाहन चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविले .

बांग्लादेशातील अल्पसंख्य हिंदु बांधवांवर अत्याचारांविरुद्ध बुढालणा जिल्हा भाजपाच्या वतिने निषेध आंदोलन करण्यात आले(buldhana )

त्यामुळे पुंजांजाजी बावणे वय ४५ वर्षे व संजय शालीग्राम बावणे यांचा मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर एकनाथ कोठे रा मनसगाव ता.शेगाव हे गंभीर जखमी झालेत.ह्या प्रकरणी दहा चाकी वाहन चालकाविरुद्ध तामगाव पो.स्टे.ला विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन अशोक लेलँड जड वाहन चालक सागर भारत हिवराळे वय 30 वर्षे रा.वल्ली ता.सावनेर जि.नागपूर ह्यास अटक केली आणि त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास तामगाव पोलीसांनी जामीनवर सोडविण्यात आले.

दोघे मृत व एक गंभीर जखमी शेतमजूर असतांना
एवढा गंभीर अपघात असल्यावरही टिप्पर चालकास तामगाव पोलीसांनी तोही नागपूर जिल्ह्यातील असतांना त्यास न्यायालयात न नेता.

Policenews :घटनेच्या दिवशीच रात्रीचे सुमारास तामगाव पोलीसांनी जमानतवर सोडून दिले हा अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होत आहे, साधा अपघात झाला तरी वाहन चालकास कोर्टात नेतात. मग हे कसे घडले.याचा विचार करण्याची गरज आहे.

Leave a Comment