शहरातील व्यवसायिक अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण उचलून छोट्या – मोठ्या व्यवसायिकाचे नुकसान करू नका – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक…
प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात व्यावसायिकांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन…
प्रतिनिधी सचिन वाघे
Hingnghat:हिंगणघाट:- शहरातील व्यवसायिक अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण उचलून छोट्या – मोठ्या व्यवसायिकाचे नुकसान करू नये, यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात व्यवसायिकांनी मुख्याधिकारी यांना दिले निवेदन…
आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)
नगर परिषद मार्फत शहरातील अतिक्रमण काढण्याचे काम सुरु आहे. परंतु या छोट्या – मोठ्या व्यवसायिकांचे नुकसान होऊ नये. याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. शहरातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे तसेच उदरनिर्वाहाचे साधने कमी असल्याने दिवसेंदिवस महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरात बेरोजगारीचा प्रश्न उद्भवला आहे.
शहरातच नव्हे तर संपूर्ण देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिक छोट्या व्यवसायातून आपला कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवीत असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपल्या पोटाची खडगी भरण्याकरिता छोटा – मोठ्या व्यवसाय टाकत असतो.
लोकसंख्या जास्त व जागेची कमतरता असल्याने मिळेल त्या ठिकाणी व्यवसाय टाकून आपला उदरनिर्वाह करीत असतात. अशा प्रसंगी शासन / प्रशासन वाटेल तेव्हा अतिक्रमण मोडकडीस काढण्याचे प्रयत्न करतो जर शासनाला अतिक्रमण काढायचे असेल तर संपूर्ण शहरातील अतिक्रमण सरसकट काढा. तसेच नगर परिषद मार्फत अतिक्रमण काढत असताना गोर गरीब नागरिक व सामान्य नागरिकांचे नुकसान न करता अतिक्रमण काढावे.
अन्यथा गोर गरीब अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढून त्यांच्यावर अन्याय करू नका असे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
Hingnghat:यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटिल, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद कोपुलवार, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगसेवक बालाजी गहलोत, माजी नगरसेवक राजेश भाईमारे, हिम्मत खान पठाण, अमोल बोरकर, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस मोह्ममद अली अजानी, प्रदेश संघटक हिमायु मिर्झा बेग, प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, मारोती महाकाळकर, सुनिल भुते,हेमंत घोडे,जितेंद्र रघाटाटे, सुनील घोडखादे, प्रवीण कलोडे, सिद्धार्थ मस्के, संदीप निबांळकर, शोहेब,शेख, नितीन भुते, कुणाल येसंबरे, गजू महाकाळकर, उमेश नेवारे, शाहिद शेख, सुशील घोडे, आकाश हुरले, आदित्य बूटे, दिनेश पिसे, राजेश बैस्वारे, सुनील मुदाफळे, दिपक अंबरवेले, पुंडलिक साठे, रोहित हजारे, मजीद शेख, सलीम पारखी, करीम खान, सचिन घोडे, पंकज भट्ट, विपुल थूल, गोलू भुते, विपूल वाढई, हूकेश ढोकपांडे, अमर धनविज, राहुल बोरकर यांच्यासह सर्व व्यवसायिक उपस्थित होते.