Hingnghat / नगर परिषद अंतर्गत विविध विकासकामांचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते भूमिपूजन

0
155

 

प्रतिनिधी :- सचिन वाघे

हिंगणघाट :- नगर परिषद अंतर्गत नगरोत्थान व दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत ९कोटी ५० रूपयांचे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते आज दी. २८/४/२४ ते ०२/०५/२०२५ पर्यंत सुरू राहणार असून यामध्ये शहरातील विविध विकासकामे होणार आहेत.

या भूमिपूजनाच्या पहिल्या टप्प्यात शितला माता मंदिर परिसरातील शासकीय जागेवरील संरक्षण भिंत बांधकाम किंमत ६० लक्ष येथून सुरूवात झाली असून याच जागेवर अग्निशमन दलाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण पार पडले.

Shivsena / शिवसेना ( उबाठा ) गटाचे नगरसेवक बंटी वाघमारे यांचे सह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हिंगणघाट नगरपालिकेच्या (MC) अग्निशमन दलात (Fire Brigade) आणखी एक नवे वाहन दाखल झाले आहे. आग, अपघात, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तत्काळ मदत पोहचवण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले शीघ्र प्रतिसाद वाहन आपत्कालीन परिस्थितीत (Emergency Situation) मदतीसाठी, नागरिकांना वाचवण्यासाठी या वाहनाचा मोलाचा उपयोग होईल,हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बळकटीकरणासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होते राज्य शासनाकडून हिंगणघाट नगरपालिका अग्निशमन दलाकरीता अत्याधुनिक सुविधा असलेले अग्निशमन वाहन उपलब्ध झाले आहेत वाहन आवश्यक सर्व साहित्याने सज्ज
आधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहन आपत्कालीन परिस्थितीत त्वरित घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. वाहनात प्राथमिक उपचार, स्ट्रेचर उपलब्ध आहेत. आगीवर जलद नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० लिटर पाण्याची व ५० लिटर फोमची क्षमता आहे.

इमारत कोसळल्यास किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत, अपघातस्थळी मदत कार्यासाठी, बचाव कार्यासाठी आपत्कालीन टूल बॉक्स, लाईफ जॅकेट, वूड कटर आदी साहित्य सामग्री उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होईल,

शहराचा विस्तार वाढत असल्याने अग्निशमन सेवा बळकट करण्याची गरज आहे. राज्य शासनाचे या विषयाकडे लक्ष वेधल्यावर एक वाहन तत्काळ उपलब्ध केले आहे. सदर वाहन बाजार परिसरात किंवा अत्यंत अरुंद रस्त्यांवर घटनास्थळी पोहोचण्यासाठी उपयुक्त आहे,त्यामुळे अग्निशमन दलात वाहनांची संख्या वाढवण्यासाठी व अग्निशमन केंद्रांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Hingnghat :असे मनोगत आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केले या प्रसंगी त्यांनी वरील मनोगत व्यक्त केले या लोकार्पण सोहळाला माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे, मुख्याधिकारी उरकुडे,शहराध्यक्ष भूषण पिसे, माजी नगरसेवक धनंजय बकाणे, अर्चना कुबडे,देवा कुबडे, अमोल खंदार,भाष्कर शेंडे,दिपक चौधरी,राजू कामडी, अतुल नंदागवळी, अग्निशमन अधिकारी गौरव गाणार , नगर अभियंता जगदीश पटेल,नासरे, इंजिनिअर अली,गिरीश गंडाईत सुनील डोळस वैभव येनगंधलवार नितीन जंगले किशोर समर्थ व अग्निशमन विभागातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here