प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट:- पतंजली योग परिवार हिंगणघाट व अभिनव विचार मंच हिंगणघाट द्वारा २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने भव्य निशुल्क योग शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन निखाडे मंगल कार्यालय हिंगणघाट येथे करण्यात आले आहे.
सदर योग शिबिराचा तिसरा दिवशी, या योग शिबीराला शुभेच्छा देण्याकरिता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सचिन कापकर सदस्य अभिनव विचार मंच प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. शरीर स्वास्थ्या करिता नियमित योग, प्राणायाम, व्यायाम, करणे हाच उपाय आहे. योग साधक,साधिकांना मार्गदर्शन करताना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.
योग शिबिराचे मार्गदर्शन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या प्रोटोकॉलचे व आसनांचे प्रात्यक्षिक योगशिक्षिका प्राची प्रसाद पाचखेडे यांनी केले. योग शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंढरी तडस यांनी केले.
Hingnghat :पतंजली योग समिती व अभिनव विचार मंच द्वारा शहरात प्रमुख मार्गाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी हिरवी झंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली.