प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- आधार फाऊंडेशन व हिंगणघाट नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण बचावासाठी कृत्रिम गणेश विसर्जन जलकुंडाची निर्मीती स्थानिक न्यू म्युनिसिपल हायस्कृल, गुरुनानक वॉर्ड, सिंधी कॉलनी येथे करण्यात आली आहे.hingnghatnews
हिंगणघाट शहरामध्ये विविध सार्वजनिक व घरगुती गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा आपण मोठ्या भक्तीभावाने करीत असतो पण ह्या मुर्ती बनविण्यासाठी माती, विविध रासायनिक रंग, प्लॉस्टर ऑफ पॅरिस चा वापर अति प्रमाणात वापर होत आहे.त्यामुळे गणेश मुर्तीचे विसर्जन व निर्माल्याचे विसर्जन नदीमध्ये करून नदीचे पाणी दुषित करित आहेत. नदी है तो जल है, जल है तो जीवन है, हे उदिष्ठ समोर ठेवून आधार फाउंडेशनच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून कृत्रिम जलकुंड गणेश विसर्जनाची निर्मिती करीत आहेत.
तसेच यावर्षी सुद्धा आधार फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण बचावासाठी कृत्रिम गणेश विसर्जन जलकुंडाची निर्मीती करण्यात आली आहे.
विविध कारणांमुळे नदी, नाले प्रदुषणयुक्त झाले आहे. यात गणेश मूर्ती विसर्जनाचाही समावेश आहे. गणेश मूर्तीसह निर्माल्य थेट नदीत विसर्जित केले जाते. त्यामुळे पाणी प्रदुषित होते. यासाठी आधार फाउंडेशन व हिंगणघाट नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वतीने कृत्रिम जलकुंड गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दिनांक ५, व ६ सप्टेंबर रोजी गणेशभक्तांनी थेट नदीत गणपती मूर्तीचे विसर्जन न करता या पर्यावरणपूरक कृत्रिम जलकुंडात गणपती विसर्जन करावे असे आवाहन आधार फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष अतुल वांदिले व आयोजकांनी केले आहे.