Hingnghatnews /ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाटच्या मुलीने टायकांडो स्पर्धेत दणदणीत खेळ दाखवत जिल्हा स्तरावरून विजय मिळवत विभागीय स्तरावर निवड.

0
77

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghatnews/वर्धा, दि.13 सप्टेंबर 2025 (शनिवार) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने क्रीडा संकुल वर्धा येथे जिल्हा स्तरीय टायकांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्षांखालील मुलींच्या गटातील तेजस्वी वानखेडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.वरोरा येथे होणाऱ्या विभागीय टायकांडो स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

शिक्षणाबरोबरच क्रीडेला समान महत्त्व देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेचे संस्थापक गिरधर राठी सतत प्रोत्साहन देतात. क्रीडा शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी सक्षम होऊन अशा स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत,Hingnghatnews

ही विशेष बाब आहे.खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गिरधर राठी (संस्थापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट व वाघोली), अर्पना राठी (अध्यक्षा), रशेष राठी (सचिव), प्रवीण धोबे (कोषाध्यक्ष), अभिनव जैस्वाल (मुख्याध्यापक – ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट), रोहन हुमाड (क्रीडा शिक्षक) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here