प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :-सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपेने शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी संत निरंकारी मिशन शाखा हिंगणघाट आणि रेल्वे वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणघाट रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.
या अभियानात संत निरंकारी मिशन हिंगणघाटची साधसंगत तसेच सेवादलाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी मिळून स्थानक परिसर, प्लॅटफॉर्म आणि आसपासच्या भागांची स्वच्छता करून समाजाप्रती जबाबदारी व सेवा भाव दर्शविला.
या दरम्यान रेल्वे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते आणि त्यांनी साधसंगत व सेवादलाच्या या सेवा कार्याचे कौतुक केले. मिशनच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की स्वच्छता ही केवळ शासकीय योजना नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, जे एकत्रितपणे पार पाडले पाहिजे.
Hingnghatnews /स्वच्छता अभियानाच्या समारोपावेळी साधसंगतने या सेवेला सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे आशीर्वाद मानत आभार व्यक्त केला आणि पुढेही समाजहितासाठी असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याचा संकल्प केला.