Hingnghatnews /ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या खेळाडूंचा जिल्हास्तरावर दमदार प्रवेश!

0
63

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट (23-24 सप्टेंबर 2025): जय जवान अकॅडमी, रिमडो येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत जिल्हा स्तरावर आपले स्थान पक्के केले.

14 वर्षांखालील मुलींच्या गटात:
वेदिका हांडे हिने लांब उडीमध्ये पहिला क्रमांक पटकावला.
अनन्या चौधरी हिने थाळी फेक या प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला.
17 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये:
भाविक सूर्यवंशी याने एकाच वेळी तीन स्पर्धांमध्ये (100 मी., 400 मी. धावणे आणि लांब उडी) प्रथम क्रमांक मिळवत उत्तुंग कामगिरी केली.
साई तडस याने 200 मीटर धावणे व 100 मीटर अडथळा धावणे या प्रकारात आपली वेगवान कामगिरी सिद्ध केली.

17 वर्ष वयोगटातील मुलींच्या गटात:
पल्लवी मुडे हिने थाळी फेक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
या सर्व खेळाडूंनी येत्या जिल्हास्तरीय स्पर्धेत वर्धा येथे शाळेचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
शाळेचे संस्थापक गिरधर राठी, अध्यक्षा अर्पना राठी, सचिव रशेष राठी, कोषाध्यक्ष प्रवीण धोबे, मुख्याध्यापक अभिनव जैस्वाल, क्रीडा शिक्षक रोहन हुमाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शाळेचे संस्थापक गिरधर राठी म्हणाले, “शिक्षणासोबतच क्रीडाही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग आहे. शाळेतील खेळाडूंनी मैदानी क्रीडेत उल्लेखनीय यश मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here