प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट, ता. ४ ऑक्टोबर – जय जवान अकॅडमी, हिंगणघाट येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत ज्ञानदा हाय स्कूल, सातेफळ मधील अंडर-१९ वयोगटातील मुले व मुलींनी उज्वल कामगिरी करत जिल्हा स्तरासाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
विद्यार्थ्यांनी 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 3000 मीटर, रिले, हर्डल्स, हाय जंप, थाळी फेक, हॅमर थ्रो तसेच वॉकिंग इत्यादी विविध प्रकारांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.
प्रमुख यशस्वी खेळाडू:
रोशन तलांडे – 100m, 200m व 400m हर्डल्स – प्रथम क्रमांक
हिमेश्वरी कोरासे – 1500m प्रथम, 3000m द्वितीय
डिंपल जुनघरी – 800m प्रथम
अनुष्का मुसळे – 100m व 400m हर्डल्स – प्रथम, हाय जंप द्वितीय
अश्विनी पाल – 400m प्रथम, हर्डल्स द्वितीय
प्रणय लोणकर – 100m हर्डल्स प्रथम
नमस्वी ठाकरे, संस्कृती दोडके, आर्यन झाडे, चेतन वांडरे, नैतिक डहाके व इतर अनेक खेळाडूंनी भरीव कामगिरी केली.
रिले स्पर्धेत देखील गटाने वर्चस्व गाजवत सर्वत्र पहिला क्रमांक पटकावला.
या शानदार यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी काशिनाथ लोणारे सर (कोषाध्यक्ष), लकी खिलोसिया सर (सह सचिव), निकीत गेडाम सर (मुख्याध्यापक) तसेच क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, संदीप खोब्रागडे, अनिल निमगडे, मार्गदर्शक भोजराज चौधरी, तालुका संयोजक खांडरे सर, सतीश तिमांडे तसेच क्रीडा शिक्षक मुस्तफा बखश, विशाखा आगलावे आणि संपूर्ण शिक्षक वृंद यांना दिले आहे.
Hingnghatnews/या यशाबद्दल सर्व स्तरातून ज्ञानदा हाय स्कूल, सातेफळ च्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.