प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट – हिंगणघाट नगरपरिषदेच्या महिला नगराध्यक्ष पदासाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहर उपाध्यक्षा दिपाली अमित रंगारी यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
पूर्वी नगरसेविका म्हणून निवडणूक लढवलेल्या दिपाली अमित रंगारी या सामाजिक कार्यातही अग्रेसर असून, त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आपली सक्रिय भूमिका बजावली आहे.
सामान्य जनतेशी त्यांचा उत्तम संवाद असून, स्थानिक समस्यांवर काम करत त्यांनी एक विश्वासार्ह लोकनेत्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. महिलांच्या हक्कांसाठी, युवा सक्षमीकरण आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत.
पक्षांतर्गत आणि शहरातील राजकीय वर्तुळात त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणारे आणि समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा विश्वास संपादन करणारे उमेदवार म्हणून दिपाली अमित रंगारी यांचा विचार प्राधान्याने होऊ शकतो, अशी माहिती काही सूत्रांकडून मिळत आहे.
Hingnghatnews/हिंगणघाटच्या राजकारणात एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून त्यांचे नाव पुढे येत असल्याने आगामी निवडणुकीत रंगतदार घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.