प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट: विकास विद्यालय, हिंगणघाटचे इ.10 वी सत्र 1993 चे विद्यार्थी यांनी अथक प्रयत्न करून तब्बल 32 वर्षांनंतर एक भव्य स्नेहसंमेलन 12 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित केले. या विशेष प्रसंगी निवृत्त शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानाने कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरीनाथ शिंदे सर होते. त्यांच्यासोबत मंचावर अंकुश खोके सर, गावंडे मॅडम, नांदुरकर मॅडम व खुपसरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमातील विशेष क्षण म्हणजे मुलींना चोळी, बांगडी व साडी देऊन ‘भाऊ’ म्हणून सन्मानित करणे — यामुळे संपूर्ण शिक्षकवर्ग भावूक झाला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सन्मानाने भारावून जाऊन सांगितले, “आम्ही घडवलेले विद्यार्थी आज ज्या प्रकारे आमचा सन्मान करत आहेत, तोच आमच्यासाठी खरा गुरुदक्षिणेचा क्षण आहे.”
विद्यार्थ्यांनी आपापल्या जीवनप्रवासातील सुख-दुःख शेअर केले, कुटुंबियांचा परिचय करून दिला. या स्नेहसंमेलनाचा प्रमुख उद्देश होता – बालपणीचे मित्र पुन्हा एकत्र आणणे, शिक्षकांचा सन्मान करणे आणि नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण करणे.
कार्यक्रमात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले – अनिल निकोडे, किशोर ठाकरे, करीम खान, विनोद वाघमारे, रुपेश नेहरोत्रा, छोटू खापरे, जगदीश चंदनखेडे, गजानन वराडे, जागेश्वर कोरडे, जगदीश सटोणे, मुनेश्वर उरकुडे, नरेश चाटगे, राजू शिंदे, रवी धात्रक, सीमा परबत (झाडे), अनिता घरट (खांडवये), गीता राऊत (भोरे) आदींचा मोलाचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व संकल्पना सादरीकरण करीम खान यांनी केले.