Hingnghatnews/ शहीद कोठारी बंधूंच्या स्मृतिदिनानिमित्त विहिप-बजरंग दलतर्फे हिंगणघाटात भव्य रक्तदान शिबिर

0
115

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट (ता. ५ नोव्हेंबर) — शहीद हुतात्मा कोठारी बंधू यांच्या बलिदान दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, हिंगणघाट शहर यांच्या वतीने श्रीराम मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४० हून अधिक रामभक्तांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आणि राष्ट्रभक्तीचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीराम आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. रक्तदान या सर्वश्रेष्ठ दानातून अनेकांचे प्राण वाचतात, या भावनेने प्रेरित होऊन युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विहिप वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार, प्रखंड मंत्री देवा वाघमारे, बजरंग दल सुरक्षा प्रमुख प्रशांत तिवारी, प्रखंड संयोजक दीपक शर्मा, नगर संयोजक संदीप नासरे तसेच अजय भोंग, सुरेंद्र आगरे, ओमप्रकाश मस्कर, हर्षल लाखे, रोशन चंदनखेडे, संदीप सातपुते, प्रमोद टिपले, अतुल सूर, शंकर गेडेकर, संजय कडू, मनीष शेंडे, राम खोकले आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

रक्तसंकलनासाठी सेवाग्राम येथील वैद्यकीय टीम उपस्थित होती. शिबिरात सूरज वर्थी, पवन गावंडे, जय आष्टाणकर, दिनेश नरड, हेमंत चाफले, नयन पणत, अंजेश पांडे, हर्षल मसाये, अनिल चांगल, महेश बोकारे, ऋषिकेश भोयर, नितीन सिंगरू, कुणाल राऊत, शुभम लाखे, राहुल जगताप, मंगेश तेल्हाडे, गोपाल जोशी, सौरभ कावळे, श्रीरंग धारकर, समीर भोयर, शंकर वरघने, निशांत शिरपूरे, कृष्णा नासरे, पंकज देशपांडे (भाजप), आदर्श सुपारे, जगदीश लोणकर, राजू खंडसकर आणि अन्य रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Hingnghatnews /या उपक्रमास पोलीस स्टेशन हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत यांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच श्याम इडपवार, भाजपचे अभय संचेती व पुंडलिक बकाने यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.
या रक्तदान शिबिरातून सेवा, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा संदेश समाजात पोहोचला. आयोजकांनी सर्व रक्तदाते व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here