प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट (ता. ७ नोव्हेंबर) — राष्ट्रीय कॅन्सर जनजागृती दिनानिमित्त रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी कॅन्सर जनजागृती सेमिनाराचे आयोजन करण्यात आले.
या सेमिनारमध्ये प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. प्रणाली सायंकार यांनी महिलांच्या आरोग्यविषयक माहिती, कॅन्सरची लवकर ओळख, तसेच प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नियमित आरोग्य तपासणी आणि योग्य जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.
महिलांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल प्राची पाचखेडे यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक मुखी आणि पूर्व अध्यक्ष माया मिहानी यांची उपस्थिती लाभली.
Hingnghatnews /कार्यक्रमाचे संचालन रोटेरियन जया मुनोत यांनी केले आणि त्यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
रोटरी क्लब हिंगणघाट हे समाजसेवा, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, या सेमिनारद्वारे महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृतीचा संदेश दिला गेला.






