Hingnghatnews /हिंगणघाटमध्ये आज भव्य सभा; फडणवीसांच्या भाषणात कोणती आश्वासने? नागरिकांमध्ये उत्सुकतेचा माहोल

0
41

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट, २८ नोव्हेंबर २०२५ भाजपा – आर.पी.आय. (आ) युतीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक / नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या जाहीर सभेची आज दुपारी १:३० वाजता गोकुलधाम मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, हिंगणघाट शहरासाठी कोणती नवीन विकासात्मक आश्वासने जाहीर होणार याबाबत नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

स्थानिक पातळीवर वाढत चाललेले पाणीपुरवठा प्रश्न, रस्ते-विकास, स्वच्छता मोहीम, औद्योगिक संधी, आरोग्य सुविधा या मुद्यांवर फडणवीस काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते सभा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गोकुलधाम मैदान परिसरात सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि सभेसाठी आवश्यक सुविधा यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

Wardhanews /नगरपालिका निवडणुकीस काहीच दिवस उरले असताना, ही सभा निवडणुकीच्या वातावरणात अतिरिक्त ऊर्जाभर घालणारी ठरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here