प्रतिनिधी – सचिन वाघे
हिंगणघाट : रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० आणि मिशन लाइफ उपक्रमांतर्गत, रोटरी क्लब ऑफ हिंगणघाटतर्फे सोमवारी (८ डिसेंबर २०२५) भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. शहरातील विविध ठिकाणी आयोजित या शिबिराला युवक, महिला आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
या उपक्रमासाठी एच.डी.एफ.सी. (जीवन ज्योती ब्लड बँक), गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा. लि., श्रीमती आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान संस्था तसेच अनेक सामाजिक संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले.
शिबिरादरम्यान एकूण 123 पिशव्या रक्ताचे संकलन करण्यात आले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरात समाजसेवेची भावना पुन्हा दृढ होताना दिसली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन पितांबर चंदानी, सचिव रोटेरियन मंजुषा मुळे, मितेश जोशी, तसेच प्रकल्प संचालक रोटेरियन शाकीरखान पठाण, जितेंद्र वर्मा, उदय भोकरे, पुंडलिक बकाने आणि सर्व रोटेरियन सदस्यांनी रक्तदाते, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.
Wardhanews /“तुमच्या थोड्याशा रक्ताने कोणाचे तरी जीवन वाचू शकते,” असे आवाहन आयोजकांनी केले.








