प्रतिनिधी सचिन वाघे
Hingnghatnews/हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने दि. 11 जुलै 2025 शुक्रवार, रोजी वर्धा येथे घेण्यात आलेल्या सुब्रोतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ज्ञानदीप विद्यानिकेतन येथील 17 वर्ष गटातील मुलींच्या फुटबॉल चमूने 1-0 ने स्पर्धक खेळाडूंचा पराभव करून घवघवीत यश संपादन केले. तसेच नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्तराकरिता आपले स्थान निश्चित केले.
फुटबॉल संघात कनक जामुनकर,तिलाष्का राठोड, श्रावणी बोरकर, श्रावणी वाणे, लीना घिये, पल्लवी मुडे, धनश्री मोहाड, दिशा पाटील, तनुजा डफ, ज्ञानाई खारपाते, अनन्या चौधरी, आरती शिरजोरकर, नंदिनी डेहणे या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षणासोबत क्रीडेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
म्हणूनच शाळेचे संस्थापक गिरधर राठी विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करतात. क्रीडा शिक्षक योग्य तालीम देऊन विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता सक्षम करतात. ही खास उल्लेखनीय बाब.
विद्यार्थ्यांच्या विक्रमा बद्दल गिरधर राठी (संस्थापक- हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था, हिंगणघाट द्वारा संचालित ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट व वाघोली), अर्पणा राठी ( अध्यक्षा), रशेष राठी (सचिव ), प्रवीण धोबे
Hingnghatnews/(कोषाध्यक्ष), अभिनव जयस्वाल (मुख्याध्यापक- ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट), रोहन हुमाड ( क्रीडा शिक्षक), पायल तळवटकर (क्रीडा शिक्षिका) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी फुटबॉल खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा क्षेत्रात उच्चांक गाठण्याचा संकल्प केला.