संपादक:- अनिल सिंग चव्हाण
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध जटाशंकर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे.
पावसाळ्यात जटाशंकर धबधब्याचे सौंदर्य अधिक खुलून येत असल्याने जिल्ह्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे पर्यटनासाठी दाखल होत आहेत.
ShegaonNews/शेगाव बसस्थानकात मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून तीन महिला, चिमुकला जखमी
पावसामुळे परिसरातील डोंगर-दऱ्या हिरव्यागार झाल्या असून, जटाशंकर धबधबा देखील पाण्याने ओसंडून वाहत आहे. उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.
धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.
कुटुंबीय, मित्रमंडळी आणि तरुणाई मोठ्या संख्येने जटाशंकरला पोहोचली आहे.
या गर्दीमुळे जटाशंकर परिसरात पर्यटनाला चांगलीच चालना मिळाली आहे.
मात्र, धबधब्याच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्यास दगड निसरडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांनी सेल्फी किंवा फोटो काढताना अतिउत्साह न करता सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे.
स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनीही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
MarathiNews / रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीवरून महायुतीत खळबळ; मंत्री नाराज?
Jatashankarnews/पावसाळ्यात निसर्गाचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची पावले जटाशंकरकडे वळली असून, धबधब्याचा खळाळता प्रवाह आणि हिरवाईने नटलेला परिसर सध्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.






