Jayntinews/आजंतीत बिरसा मुंडा यांच्या 150 वी जयंती उत्सव”

0
13

 

प्रतिनिधी सचिन वाघे

आजंती : दिनांक 15/11/2025 रोजी विरांगणा महाराणी दुर्गावती उत्सव समिती आदिवासी महिला मंडळ आजंती यांच्या तर्फे आदिवासींचे महानायक बिरसामुंडा यांची 150 वी जयंती अत्यंत उत्साहात गुरुदेव सेवा मंदिराच्या प्रांगणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या अध्यक्ष पंचफुला हनुमान आत्राम, उपाध्यक्ष सौ. कल्पनाताई नागोजी टेकाम तसेच सर्व सदस्य महिला व पुरुष मंडळी आणि युवावर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत आजंतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य राजेश कोचर, आदिवासी युवा बिरसा एक संघ समितीचे अध्यक्ष प्रितम कुमरे, समाजसेवक धनंजय सराटे, तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण भालकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास तमाम आदिवासी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jayaninews/कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. गजानन टेकाम यांनी करताना बिरसा मुंडा यांच्या अद्वितीय कार्याची आठवण करून दिली. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. प्रकाश मेश्राम यांनी केले. देशाच्या स्वातंत्र्य व आदिवासी हक्कांच्या रक्षणासाठी झटलेल्या बिरसा मुंडा यांच्या विचारांचा जागर प्रसार करण्याचा संकल्प या कार्यक्रमात घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here