Jijamata jayanti | सकल मराठा समाजा कडून सामाजिक कार्यातून राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी शासकीय रुग्णालयाना केले रुग्णांना अन्नदान..

0
1

 

ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर  अकोला.

मूर्तिजापूर:-Jijamata jayanti: सकल मराठा समाजाच्या वतीने मूर्तिजापूर शहरात विविध ठिकाणी सामाजिक कार्यातून राजमाता जिजाऊ यांची 426व्या जयंती निमित्य श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

स्वराज्य जननी, शेतकऱ्यांच्या कैवारी, ज्यांच्या प्रेरणेतून जगाला अभिमान वाटावा असा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज मिळाले त्यांनी स्वराज्याची स्थापना करून लोकशाही रुजवली, स्त्रियांना सन्मान मिळवून दिला.

अशा थोर राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्य मूर्तिजापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वप्रथम माँ जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तद-नंतर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून सामाजिक कार्यातून जयंती साजरी करण्यात आली.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

Jijamata jayanti:या वेळी सकल मराठा समाजाचे मुन्ना नाईकनावरे, सुधाकर शेळके, शरद हजबे, शाम वाळसकर, पिंकू शर्मा,पप्पू तिडके, शाम येवले, विष्णू लोडाम, विवेक शिंदे, आकाश चिकणे, जाधाव, प्रदीप माने,चेतन पवार, प्रतिक गांजरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here