प्रदूषणाचे धोके मांडणाऱ्या नागरिकांचा माईक खेचल्याने संताप
अँकर……रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ डोलवी येथील तिसऱ्या टप्प्यातील जे एस डब्लू प्रकल्प आणि धरमतर पोर्ट यांच्या विस्तारी करणासाठी पर्यावरण पूरक जनसुनावणी धरमतर जेट्टीनजीक आज घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली जन सुनावणी पार पडली.

पावणेतीन वाजता सुरू झालेल्या जन सुनावणीत जे एस डब्लू च्या अधिकाऱ्यांनी त्यांचे उपक्रम रंगवण्यात , व प्रकल्प किती गोजिरवाणा हे सांगण्यात जन सुनावणीचा अर्धा वेळ खर्ची केला. तर उरलेल्या वेळात स्थानिक, भूमिपुत्र , शेतकरी पर्यावरण प्रेमी हे प्रदूषण , रोजगार, आरोग्य, शेती, खरबंदिस्ती व पर्यावरणाचे मुद्दे पोटतिडकीने मांडत असताना विरोधकांचे मुद्दे ऐकून न घेता जनसुनावणी लगबगीने आटोपती घेतल्याने जनतेतून संतापाची लाट उसळली, यातही कहर म्हणजे बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या हातून माईक खेचून घेतल्याने सुनावणी बाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली.
Farmernews/कवठे येथील समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचा राष्ट्रीयस्तरावील चर्चा सत्रात सहभाग
तर अनेकांनी ही सुनावणी बेकायदेशीर झाली असल्याचे सांगितले. प्रदूषणाने मृत्युदर वाढत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष का करतोय? आजची जनसुनावणी नेमकी कशासाठी होती? केवळ फार्स व दिखाऊ गिरी का करण्यात आली,.
जनसूनावणीत हरकती मांडणाऱ्या नागरिकांचा आवाज का दाबण्यात आला, प्रदूषणाचे मुद्दे मांडले जात असताना गोंधळ का झाला? असे अनेक सवाल या जनसुनावणीच्या निमित्ताने अनुत्तरित राहिले आहेत.