प्रतिनिधी सय्यद जहीर
Lonar :शहरात स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छता ही सेवा अभियान 2024 अंतर्गत मा.मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे मॅडम यांच्या आदेशानुसार तथा मा. स्वच्छता निरीक्षक योगेश साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद कार्यालय लोणार द्वारा लोणार शहरतील आठवडी बाजार व बस स्थानक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहीम अंतर्गत आठवडी बाजार परिसर व बस स्थानक परिसर येथील संपुर्ण परिसरामधील नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांद्वारे साफसफाई करण्यात आली.
तसेच ST महामंडळ कर्मचाऱ्यांनी देखील या अभियानात सहभाग नोंदविले.
Lonar :सदर विशेष स्वच्छता मोहिमेत शहर समन्वयक अथर रौनक अली, दरोगा याहया खान, आरोग्य लिपिक शेख सलीम शेख रफिक, बाबाराव घाटोढे यांच्या सह सर्व सफाई कर्मचारी, न.प. कर्मचारी उपस्थीत होते.