सहामास कार्यक्रमात वडिलांना लेकाची वैचारिक आदरांजली(Lonarnews)

0
1

 

बिबी प्रतिनिधी :-सय्यद जहीर

Lonarnews:लोणार तालुक्यातील चिखला काकड येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक काकड यांच्या वडिलांचे निधन १७ ऑगस्ट २०२४ रोजी झाले.
त्यांच्या वडिलांची वारकरी संप्रदायावर प्रचंड निष्ठा होती आणि ते तत्वनिष्ठ होते.

जिवंतपणी कधीच कुणाचे वाईट केले नाही मग त्यांच्या मरणानंतर पर्यावरणाला देखील कुठलाचं त्रास नको.
माणूस गेल्यानंतर आपण रक्षा आणि अस्ति व इतर वस्तू नदीमध्ये विसर्जित करतो पण त्याचे विघटन होण्यासाठी बराच काळ लागतो व त्याचा जलचरास त्रास देखील होतो. तोच त्रास टाळण्यासाठी व पर्यावरणाला हानी करणाऱ्या रुढींना थांबवण्यासाठी मुलगा विनायक यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला.

शुभ लाभ नागरी सहकारी पतसंस्था हिंगणघाट हळदीकुंकु कार्यक्रम(Hingnghat)

वडिलांची रक्षा नदीमध्ये विसर्जित न करता आपल्या शेतामध्ये नेऊन त्यावर वृक्षारोपण केले.
जेणेकरून वडिलांची आठवण कायम राहील व हे वृक्ष पर्यावरणास पूरक ठरेल.त्यानंतर वडीलांच्या सहा मास विधी व नैवद्य कार्यक्रमात देखील विनायकने अनोख्या आदर्श पद्धतीने राबविला. स्व.जगन्नाथ काकड हे उत्तम वाचक होते व ते पर्यावरणवादी, पर्यावरणप्रेमी देखील होते त्यांना वृक्षारोपणाची प्रचंड आवड होती.

आज दिवसेंदिवस वाचन चळवळ ही लोप पावत चालली आहे आणि निसर्गाचा देखील ऱ्हास होत चालला आहे.
वाचन चळवळ वृंद्धिगत व्हावी व पर्यावरण रक्षणाचा छोटासा संदेश देण्याचा विनायकने प्रयत्न केला आहे.
वडीलांच्या सहा मास नैवद्य कार्यक्रमात विनायकने कुठलाही अपव्यय खर्च न करता कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्येक पाहुणेमंडळी, मित्रपरिवार, आप्तेष्टांना विनायकने पुस्तकं व दुर्मिळ रोपांच्या बिया देऊन वाचनाचे व वृक्षरोपणाचे आवाहन करून वडिलांना अनोखी आदरांजली दिली आहे.
आपली वाचनाची व पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा हीच माझ्या वडिलांना खरी आदरांजली असेल असेल विनायक काकड यांनी उपस्थितांना संबोधित केले आहे.

विनायक काकड हे उत्तम वक्ता व सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. अनेक सामाजिक चळवळीत ते सक्रिय सहभागी असतात.ते सध्या निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय मुंबई येथे पदवीचे शिक्षण घेत आहेत. विनायकच्या या अनोख्या विचाराने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lonarnews:वाचन व पर्यावरण चळवळ ही प्रत्येक व्यक्तीच्या मरणोत्तर राबवावी यासाठी विनायकने समाजामध्ये प्रबोधन करण्याचा निर्धार वडिलांच्या सहामास कार्यक्रमात केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here