लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर
Lonarnews:लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटींच्या वतीने लोणार लोणार बस स्थान समोर लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात
मा विकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्तेयांनी तोंडाला काळ्यापट्टा बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करणार करण्यात आले.
कलकत्ता आणि बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक 24 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा बंदचे आव्हान करण्यात आले होते. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.
सदर निर्णयाविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात पक्ष दाद मागणार आहे. परंतु तोपर्यंत आता हा बंद संविधानाचा आदर राखून आम्ही मागे घेत आहोत.
आज कलकत्ता येथील महिला डॉक्टर आणि 2 बालिकांवर झालेला जो अत्याचार आहे. या घृणास्पद प्रकाराच्या विरोधात मा विकास आघाडीच्या वतीने बस स्टँड चौकात सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते तोंडाला काळ्यापट्टा बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी महविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते साहेबरावजी पाटोळे, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चिभडे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, भूषण मापारी, उपाध्यक्ष बादशाह खान पठाण, प्रदीप भाऊ संचेती,जिल्हा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रा. गोपाल बच्छिरे,
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी,
तालुका उबांटा तालुकाध्यक्ष एडवोकेट दीपक मापारी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप मापारी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तोफिक कुरेशी, उद्धव बाळासाहेब गटाचे शहर अध्यक्ष गजानन जाधव, माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे, प्राध्यापक सुदन अंभोरे, नगरसेवक संतोष मापारी, नगरसेवक शेख रउफ भाई, नगरसेवक सतीश राठोड, ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे,
Lonarnews :-माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, पंढरीचाटे, शेख अस्लम शेख कासम, उद्धव बाळासाहेब गटाचे तानाजी मापारी, राजु बुधवंत,उपाध्यक्ष लुकमान कुरेशी,सय्यद उमर, प्राध्यापक सुदन कांबळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकबाल कुरेशी,मीडीया सेल शहर अध्यक्ष मोसिन शाह, महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.