Mahamarg Bus Accident/ खाजगी बसने दुचाकीवरील तिघांना चिरडले होते.तिघांचे बळी घेणारा फरार ट्रॅव्हल्स चालक गजाआड; तीन दिवसानंतर अटक

 

Mahamarg Bus Accident

बुलढाणा : खाजगी बसणे राष्ट्रीय महामार्गावर तिघांचे बळी घेणाऱ्या व अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या चालकास नांदुरा पोलिसांनी तीन दिवसाच्या आत अटक केली. असून घटनेच्या तिसऱ्या दिवशी आरोपीला अटक करण्यात आली. व संदीप विश्वनाथ पवार (रा. डिग्रस खुर्द, ता.पातुर, जि. अकोला ) असे आरोपी चालकाचे नाव आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वडनेर (भोलजी) पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस नायक विक्रमसिंह राजपूत यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

राष्ट्रीय महामार्गावरून आरोपीने १४ नोव्हेंबरला आपल्या ताब्यातील खासगी बस भरधाव वेगात व चुकीच्या बाजूने चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रं ५३ वरील वडनेर (भोलजी) नजीकच्या हॉटेल विश्वगंगा जवळ ही दुर्घटना घडली होती.

पण या अपघातात गोपाल शालीक राणे, स्वप्नील करणकार (जळगाव खान्देश), आकाश राजु आखाडे ( कल्याण) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. या दरम्यान, १६ नोव्हेंबर रोजी चालक संदीप पवार याला नांदुरा पोलीसांनी ताब्यात घेतले.

https://www.suryamarathinews.com/sameer-wankhede-समीर-वानखडे-ncb/

व त्याच्याविरुद्ध भादंवीच्या कलम २७९, ३०४ (अ), मोटर वाहन कायद्याच्या कलम११९/१७७, १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले व हवालदार उमेश भारसाकळे करीत आहेत.

सूर्या मराठी न्यूज वेबसाईटला लाईक करा फॉलो करा crime news /Mahamarg Bus Accident

Leave a Comment