Maharashtra police News | पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा , या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ

 

Maharashtra Crime News | धुळे जिल्हातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात

या घटनेत एकच खळबळ उडाली आहे. रक्षकच भक्षक झाल्याचे कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आणि ज्यांचे शोषण झाले त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी आहे, तोच रक्षक भक्षक झाल्याची चर्चा पोलीस दलासह जिल्ह्यात होत आहे.

धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नुकतीच धुळे जिल्हातील सायबर सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली करण्यात आले.

मागील काही दिवसांपासून त्यांचा एक अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यामुळे अचानक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी एका महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

इथे क्लिक करा

https://www.suryamarathinews.com/animals/

त्यानुसार हेमंत पाटील यांच्यावर IPC 354 A, 354 B, 354 D, 509, 506, 34 तसेच
आयटी अॅक्ट कलम 67, 67 A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्हातील पोलीस दलातील अधिकाऱ्यावर अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र मध्ये पोलिसाला सर्मशार केले.Maharashtra Crime News)

Leave a Comment