Maratha Reservation : ”500 कोटी द्या अन् माझी मालमत्ता घेऊन जा”

 

नाशिक : ”माझ्याकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याची टीका केली जाते. आता बोलण्यापासून कुणाला अडवावे, ही लोकशाही आहे. लोकांच्या वाट्टेल ते बोलण्यामागे प्रसिद्धी असते.#NashikNews

माझ्याकडे इतकी संपत्ती असेल तर मला ५०० कोटी आणून द्या अन् माझी सर्व संपत्ती घेऊन जा, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा नामोल्लेख टाळत टोला मारला.#MarathaNews

जरांगे पाटील यांच्या सभेच्या खर्चावरून भुजबळ यांनी टीका केली होती. यावर उलटवार करताना भुजबळांकडे सहा हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे वक्तव्य जरांगे यांनी केले होते. यावर भुजबळ यांनी त्यांचा नामोल्लेख टाळत टोला मारला.#Aarkshan

अमृतकलश यात्रेच्या उपक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कंत्राटी भरतीवरील प्रश्नावर बोलण्यास भुजबळ यांनी नकार दिला. यापुढे कंत्राटी भरती होणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तेव्हा हा विषय आता संपला आहे, असं ते म्हणाले.#Ajitpawar

Leave a Comment