maratha reservation / राहेरी बु येथे मराठा आरक्षण साठी साखळी उपोषणाला सुरुवात :-मनोज जरांगे पाटलाला गावकऱ्यांचा पाठिंबा

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे

सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बु गावामध्ये नेत्यांना गावबंदीसाठी फलक लावण्यात आले असून आमदार खासदार व पुढारी यांना गावबंदी असून विनाकारण आमच्या गावात येऊ नये अशी फलक लावण्यात आली राहेरी बु येथील गावकरी यावरच न थांबता मराठा आरक्षण साठी अंतरवाली सराटीला बसलेले संघर्ष युद्धा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज 31/10/2023 पासून साखळी उपोषणाला बसलेली आहे म्हणून जरांगे पाटलाला मराठा समाजाकडून विदर्भातही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बु येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे या उपोषणाची तालुक्यात सगळीकडे गावोगावी सुरुवात होण्याची शक्यता आहे या ठिकाणी मराठा बांधव आक्रमक झालेली दिसून येत आहे.

अंतरवाली सराटीला बसलेले मनोज पाटील यांना पाठिंबा म्हणून साखळी उपोषणासाठी राहेरी बुद्रुक येथील मनोहर देशमुख भगवान देशमुख मदन देशमुख राजेंद्र देशमुख सुरेश देशमुख अरुण देशमुख विठ्ठल देशमुख धनंजय देशमुख संभाजी राजे किशोर देशमुख डॉ जुगलकिशोर राजे उल्हास देशमुख आनंद देशमुख आशिष देशमुख संदीप देशमुख कुणाल सरकटे सुधाकर सरकटे रामकिसन देशमुख माणिक देशमुख बबन देशमुख विनायक देशमुख गोपाळ देशमुख जनार्दन देशमुख आशिष देशमुख प्रमोद देशमुख बंडू मोरे प्रकाश मोरे बबन शिंदे रवी देशमुख दत्ता राजे सुनील देशमुख दत्ता देशमुख अशा इत्यादी गावकऱ्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे

डाँ राजेंद्र शिंगणे आमदार

महाराष्ट्रात मराठा आरक्षण विषयी मी प्रतिक्रिया देणारा पहिला आमदार आहे मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळायला पाहिजे सरकारने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता मराठा आरक्षण ताबडतोब द्यावा मनोज जरांगे यासारख्या माणसासाठी आमच्या मराठा समाजाला गरज आहे.

त्यांची प्रकृती खालावत आहे आम्हाला त्यांची काळजी वाटते सरकारने जास्तीची चर्चा न करता मराठा आरक्षण लवकरात लवकर देण्यात यावे राहेरी बु येथील मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे maratha reservation

Leave a Comment