प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा गळा दाबून केला खून! / murdernews 

 

” अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने काढला काटा

अवघ्या काही तासांतच हत्तेचा उलगडा

आरोपी घटनास्थळावरच

खूनाच्या गुन्ह्याला अंजाम दिल्यानंतर आरोपी फरार न होता गावातच थांबला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपासकार्यसुरु केल्यानंतरही आरोपी संतोष पोलिसांच्या अवतीभोवती घिरट्या घालत राहीला. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांना त्याच्यावर संशय आला म्हणून त्यांनी संतोषला ताब्यात घेतले आणि गुन्ह्याचा उलगडा झाला.

समोर आली. क्षणाचाही विलंब न करता आरोपी संतोष थोरवे ( वय ३७ वर्षे) यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देणाऱ्या संतोषला पोलिसांनी ‘सुंदरी’चा प्रसाद चाखवताच त्याने केलेल्या खूनाची कबुली दिली. त्यामुळे अवघ्या काही तासांतच सदर गुन्हा उघडकीस आला.

राजाराम जायभाये (मृतक)

संतोष थोरवे (आरोपी)

लोणार, दि. ३० (लोणार प्रतिनिधी सुनील वर्मा)

विवाहबाह्य संबंधाची वाळवी अनेकांच्या संसाराला पोखरत आहे. नव्हे तर त्यांच्या संसराची राखरांगोळी करत आहे. कुठे पतीकडून पत्नीचा, तर कुठे पत्नी किंवा प्रियकराकडून पतीचा खून होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच एक घटना नुकतीच पळसखेड (ता. लोणार ) येथे उघडकीस आली. अनैतिक संबंधात अडसळ ठरत असल्याचे पाहून प्रियकराने प्रेयसीच्या पतीचा गळा दाबून खून केला. मात्र, लोणार पोलिसांनी अवघ्या काही तासांतच उपरोक्त खूनाचा उलगडा करत आरोपी प्रियकरास बेड्या ठोकल्या..

पळसखेड (ता. लोणार ) येथील रहिवासी असलेला राजाराम गजानन जायभाये ( वय ३० वर्षे) याचा २८ ऑक्टोबरच्या

सायंकाळी ५ ते २९ ऑक्टोबरच्या सकाळी ७.३० दरम्यान अज्ञाताने खून केल्याची घटना उघडकीस आली होती. मृतकाचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, लेखनिक गणेश लोढे, पोलीस अंमलदार विशाल धोंडगे, नितीन खरडे, संतोष चव्हाण, भाऊसाहेब मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे यांनी तत्काळ तपासचक्रे फिरवित गोपणीय माहिती काढली.

राजाराम जायभायेच्या खुनाला अनैतिक संबंधाची किनार असल्याची बाब

या प्रकरणी मृतकाचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी आरोपी संतोष थोरवे याच्या विरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शेळके हे करीत आहेत. murdernews

Leave a Comment