स्था. गु.शा. ची कारवाई मोठी कारवाई, 1 कोटी 14 लाख 08 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत,  Marijuana

 

Marijuana
बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” जवळ बाळगून त्याची चोरटी वाहतूक व विक्री आणि करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर अंमली “औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम” कायद्यानुसार कारवाई करणे बाबत सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते.

सदर अनुशंगाने पोनि.अशोक लांडे स्था.गु. शा. बुलढाणा यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करुन, त्यांना अंमली औषधीद्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ जवळ बाळगून वाहतूक करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

या अनुशंगाने, दि. 09/11/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, काही ईसम हे त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये अंमली औषधीद्रव्ये व मन: प्रभावी पदार्थ (गांजा) बाळगून, विक्री करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथून भोकरदन मार्गे धाड शहराकडे येत आहेत. त्या वरुन स्थानिक गुन्ह शाखेच्या पथकाने पो.स्टे. धाड हद्दीतील हॉटेल स्वराज जवळील राज्य महामार्गावर सापळा कारवाई करुन, एक टाटा कंपनीचे मॉडल क्रमांक-1215 पकडून दोन ईसमां विरुध्द अंमली औषधीद्रव्ये व मन: प्रभावी पदार्थ (गांजा) जवळ बाळगून, वाहतूक केल्या प्रकरणी

एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार कारवाई केली. त्यामध्ये पकडलेला आरोपी राहूल गोटीराम साबळे वय 27 वर्षे, रा. कुऱ्हा, ता. मोताळा जि. बुलढाणा यांचे ताब्यातून (1) गांजा 04 क्विटल 59 किलो 400 ग्रॅम किंमत 91,88,000/- रुपये, (2) एक टाटा कंपनीचे मॉडल क्रमांक-1215 वाहन किं. 22,00,000/- रुपये (3) दोन मोबाईल किं. 20,000/- रुपये असा एकूण 1,14,08,000/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदर गुन्ह्यातील 01 आरोपी फरारी असून त्याचा स्थागुशा यांचे पथका कडून शोध घेण्यात येत आहे. प्रकरणी आरोपी राहूल गोटीराम साबळे वय 27 वर्षे, रा. कुऱ्हा, ता. मोताळा जि. बुलढाणा व ईतर 01 याचे विरुध्द पो.स्टे. धाड येथे अंमली औषधीद्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम कलम 8, 20, 29 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्ह्याचा पुढील तपास पोनि. स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. निलेश सोळंके स्था. गु. शा. बुलढाणा करीत आहेत.सदरची कारवाई सुनिल कडासने- पोलीस अधीक्षक बुलडाणा यांचे आदेशान्वये तर अशोक थोरात-अपर पोलीस अधीक्षक खामगांव, बी. बी महामुनी, अपर पोलीस अधीक्षक- बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.

अशोक लांडे प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांचे नेतृत्वात सपोनि. मनिष गावंडे पो.स्टे. धाड, सपोनि. नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोउपनि. श्रीकांत जिंदमवार, सफौ. गजानन माळी, पोहेकॉ. शरद गिरी, पंकज मेहेर, एजाज खान, Marijuana

दिपक लेकुरवाळे, राजकुमार राजपूत, पोना. अनंता फरताळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, गजानन दराडे, पोकॉ. विक्रांत इंगळे, गजानन गोरले चालक-पोहेकॉ. शिवानंद मुंडे, चापोना. राहूल बोर्डे, चापोकॉ. विलास भोसले सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांच्या पथकांनी पार पाडली.Marijuana

Leave a Comment