प्रतिनिधी सचिन वाघे
media_हिंगणघाट – डिजिटल मीडिया क्षेत्राच्या वाढत्या प्रभावाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि पत्रकारांना त्यांच्या हक्कांसाठी संघटित करण्याच्या उद्देशाने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र अंतर्गत हिंगणघाट तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली._
दिनांक 17 मार्च रोजी हिंगणघाट येथील के. जी. एन. हॉल येथे संपन्न झालेल्या एका विशेष समारंभात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या निर्देशनाखाली व राज्य समन्वयक इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया पत्रकारांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात सशक्त नेटवर्क उभारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
हिंगणघाट तालुका कार्यकारिणी – जबाबदारीची नवी धुरा
संघटनेच्या हिंगणघाट तालुका कार्यकारिणीत खालील पदाधिकारी निवडण्यात आले –
अध्यक्ष अब्दुल कदीर बख्श, उपाध्यक्ष सचिन वाघे, जावेद पाशा कार्याध्यक्ष आसिफ कुरैशी, सचिव करीम खान पठाण, सह सचिव मंगेश लोखंडे ,कोषाध्यक्ष प्रज्योत लिहितकर , सह कोषाध्यक्ष आसिफ मलनस, प्रसिद्धी प्रमुख राहुल दारुणकर, संघटक सैय्यद जाकिर,कार्यकारिणी सदस्य अश्विन बोन्दाडे, शेख फैमुद्दीन, निखिल ठाकरे, सलीम शेख विलास नवघरे, आदी डिजिटल मीडिया – बदलत्या युगातील प्रभावी माध्यम आजच्या डिजिटल युगात डिजिटल पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे,
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
डिजिटल मीडियाचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर दिसून येतो. अशा परिस्थितीत, डिजिटल पत्रकारांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी संघटित करणे हाच संघटनेचा मुख्य उद्देश आहे
या संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आणि माध्यम क्षेत्रात सक्षम भूमिका बजावण्यासाठी एकत्र येणार आहेत.
media_हिंगणघाट संघटनेच्या पुढील वाटचालीकडे लक्षया नवीन कार्यकारिणीच्या स्थापनेसह, डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संपादक आणि पत्रकारांना अधिक बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पत्रकारांच्या हितासाठी संघटना सातत्याने कार्यरत राहील आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सामूहिक पातळीवर प्रयत्न केले जातील