मनसे पदाधिकाऱ्यांवरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या जिल्हा पोलिस अधीक्षक यांना जळगाव जामोद ठाणेदारा मार्फत निवेदन ( mns news )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जळगाव जामोद.चिखली येथे शेतकर्यांना न्याय देण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे; तसेच शेतकऱ्यांची लुटमार करीत असलेल्या बेकायदेशीर खाजगी अडत व्यापार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत – मनसेने दिले जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा यांना जळगाव जामोद ठाणेदार मार्फत निवेदन

जळगाव जामोद: बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील एम.आय.डी.सी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असतात. शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालावर त्या ठिकाणी असलेले खाजगी अडत व्यापारी हे १% बटाव म्हणून शेतकर्यांची लुट करीत होते. शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला असता गेट बंद करून मारण्याच्या धमक्या हि अडत व्यापारी मंडळी देत होती. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी हि बाब मनसे पदाधिकाऱ्यांचे निदर्शनास आणून दिली.

व ते शासकीय अधिकाऱ्यांसमक्ष (एम.आय. डी.सी.) परिसरातील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गेले त्या ठिकाणी तिरुपती जिनींगचे गोविंद अशोक अग्रवाल यांनी १% बटवा हिच आमची कमाई आहे.तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे म्हणत त्या ठिकाणी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन सहा. निबंधक घोंगे व शेतकऱ्यांना सर्वोच्च भाषेत बोलत पैसे परत करण्यास नकार दिला.

आमदार अनिल बाबर पंचत्वात विलीन : मान्यवरांकडून भावपूर्ण श्रध्दांजली ( MLA Anil Babar Death )

त्या ठिकाणी आमचे पदाधिकार्यांनी त्यांना विरोध दर्शविला असता, त्या ठिकाणी कामावर असलेले परप्रांतीय बिहारी, यु.पी. चे कामगार यांनी त्यांचे अंगावर येत घाणेरड्या शिवीगाळ करीत मनसेचे राजेश परिहार व नारायण बाप्पु देशमुख या दोघांचे गळ्यातील सोन्याची चैन व प्रदिप भवर यांचे वरच्या खिशातले अंदाजे ६,५०० रुपये रक्कम त्या ठिकाणी या मंडळींनी जमावाद्वारे लोटपाट करीत काढून घेतली.

त्यामुळे तिथे वाद निर्माण झाले परंतु त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी मध्यस्थी होत वाद मिटवला. त्यानंतर गोविंद अग्रवाल यांनी आमचे मनसे पदाधिकारी हे खंडणी मागायला आले असल्याचे खोटे आरोप करीत FIR नं. ००७२/२०२४ नुसार आमचे पदाधिकार्यांवर खोटे गुन्हे दाखल केले.

मात्र आमचे उपस्थित मनसे पदाधिकारी हे शासकीय कर्मचाऱ्यांचे समवेत त्या ठिकाणी फक्त पाहणीसाठी गेले होते.जर बटाव विरुद्ध विरोध दर्शविला तर मनसे पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केले मग त्यांचे सोबत शासकीय कर्मचारी सुध्दा उपस्थित होते. त्यांचेवर सुद्धा खंडणीचे गुन्हे दाखल व्हायला हवे होते.

परंतु वास्तविक पाहता हा सर्व प्रकार केवळ राजकीय सुडापोटी केला जात असुन, महाराजा अग्रसेन खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक बाबुलाल अग्रवाल हे भाजपा व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष असुन सत्तेत असल्या कारणाने त्यांनी आमचे पदाधिकार्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तरी राजकीय सुडापोटी दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात येऊन शेतकऱ्यांची लुटमार करीत असलेल्या खाजगी अडत व्यापार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येऊन शेतकर्यांना न्याय देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र भर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ठाणेदार पोलिस स्टेशन नांदुरा मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक बुलडाणा यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

mns news : सदर निवेदन देतेवेळी मनसे माथाडी कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष राजू राऊत , शहराध्यक्ष नागेश भटकर, प्रमोद यऊल, ऋषिकेश पाटील, यासह मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment