इस्माईलशेख बुलढाणा जिला प्रतिनिधि
शेगाव: Nationalist Congress: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शेगाव शहर व तालुक्याच्या वतीने शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांना आज एक फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय शेगाव येथे शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार युवक महिला अंगणवाडी सेविका आदींच्या संबंधातील विविध समस्या सोडविण्याबाबत निवेदन सोपविण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा पदाधिकारी जेष्ठ नेते प्रसंजीत पाटील व पांडुरंग दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे निवेदन सोपविण्यात आले तहसीलदार शेगाव यांना देण्यात आलेल्या निवेदना
१) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी. दुष्काळ संबंधित दोन्ही शासन निर्णयातील तफावत दूर करून सर्वच महसूल मंडळांना NDRF निकषांच्या चारपट मदत देण्यात यावी२) राज्यात रिक्त असलेली सर्व विभागांच्या सर्व संवर्गाची अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.३) छुप्या पद्धतीने सुरु असलेली कंत्राटी भरती तत्काळ बंद करावी.
धक्कादायक प्रकार धावत्या बसमधील अचानक पत्रा सरकला अन् विद्यार्थिनी इंजिनमध्ये अडकली,( busnews )
४) अवाजवी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व याआधी घेण्यात आलेले अवाजवी शुल्क परत करावे.५) ६० हजार रिक्त पदांची शिक्षक भरती, रखडलेल्या सर्व प्राध्यापक पदांची भरती यांसारख्या रखडलेल्या भरती प्रक्रिया तत्काळ सुरु कराव्यात.
तसेच प्रलंबित असलेल्या सर्व नियुक्त्या तत्काळ देण्यात याव्यात. यासह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
Nationalist Congress: निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसेनजीत पाटील ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा पाटील शहराध्यक्ष दिनेश साळुंखे तालुका अध्यक्ष संजय पहुरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सलमान खान सुधाकर ढोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत