इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
mobaile:शेगांव येथील निर्भिड पत्रकार इस्माईल शेख हे २८ जानेवारीच्या रात्रीअतिक्रमणाची बातमी घेण्यासाठी गेले असता त्यांना शेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्त्यावर एक विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किमंत अंदाजे १८००० रुपयांचा आढळून आला.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न(Lonar)
पत्रकार इस्माईल शेख यांनी पत्रकारितेची माणूस दाखवत लगेच शेगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितिन पाटील यांना मोबाईल सापडल्याचा रात्री २:३६ मिनिटांनी व्हॉट्सॲपला मॅसेज टाकला व दुसऱ्या दिवशी शहर पोलीस स्टेशन गाठत पत्रकार इस्माईल शेख यांनी तो सापडलेला मोबाईल हा ठाणेदार नितीन पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळेस नितिन पाटील यांनी पत्रकार इस्माईल शेख यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांचे कौतुक केले.
mobaile:इस्माईल शेख यांच्या सोबत पोलीस स्टेशनला मोबाईल जमा करतेवेळी पत्रकार अनिल उंबरकर, राजकुमार व्यास, विवेक शेगांवकर, गजानन ददगाळ, महेंद्र मिश्रा, ललित देवपूजारी हे उपस्थित होते.