रामेश्वर गायकी /संग्रामपूर बुलढाणा
निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन.]

mudernews:संग्रामपूरः- बजाज नगर अमरावती येथील देशमुख परिवारातील दोघांची निर्घून हत्या करण्यात आली.ह्या घटनेचा तीव्र निषेध करुन प्रकरण जलद गतीने चालवून मारेक-यांवर कठोर कारवाई करुन न्याय द्यावा.
असे निवेदन संग्रामपूर तालुका मराठा महासंघ व शिवसेच्या पदाधिकारी यांचे वतीने आज दि.३/५/२०२४ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे नावे संग्रामपूर तहसिलदार यांचे मार्फत देण्यात आले.
दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )
अमरावती मधील बालाजी नगर मंगलधाम काॕलनी येथील सौ,कुंदाताई विजय देशमुख व सुरज देशमुख यांची दि.२९/४/२०२४रोजी निर्घुण हत्या केली.ही कृरपणे निर्दयी सुनियोजित हत्या असून उपर्डी कृत्य कांडातील घटनेची पुनरावृत्ती दिसणारी घटना दिसते.
आम्ही ह्या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत.घटनेतील आरोपी व सहकारी यांचेवर कठोर गुन्हे दाखल करुन केस जलदगतीने चालवून कारवाई व्हावी व देशमुख मराठा समाजाला न्याय द्यावा आसे निवेदन संग्रामपूर तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
mudernews:निवेदनावर जळगाव जामोद विधान सभा शिवसेनेचे मा. विलासराव भास्करराव देशमुख,मराठा महासंघाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील देशमुख ,अनंतराव देशमुख ,ज्ञानेश्वर दांदळे,असलमभाई, चेतन देशमुख ,प्रणवा देशमुख ,दिपक अढाव,चेतन बकाल,रवि पा. नंदू खानझोड शेख कदिर भाई यांचेसह इतरांच्या सह्या आहेत,


![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)




