प्रतिनिधी शाम वाळस्कर
सूर्या मराठी न्यूज अकोला
Anchor – मूर्तिजापूर येथील तोलाराम (भगतसिंग ) चौकात पूर्व वैमनस्यातून एकाची हत्या झाल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.
Vo – गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेला सुरेश देशमुख हा अनेक दिवसांपासून कारागृहात होता काही दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आला होता. तेव्हापासून त्याच्यावर पाळत ठेवून त्याची आज नियोजितपणे हत्या करण्यात आली.अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचे बोलल्या जात असून सुरेश देशमुख (५२) हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याने त्याचे अनेकांसोबत खटके उडाले असल्याची माहिती आहे.
तो एका गंभीर गुन्ह्यात कारागृहात एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असल्याचे समजते. शुक्रवारी बाजाराचा दिवस असल्याने शहरात सर्वत्र वर्दळ होती याचाच फायदा घेऊन काही अज्ञातांनी सुरेश देशमुख यांच्यावर धारदार शस्त्रानी हल्ला चढविला त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या संदर्भात शहर पोलीसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत. Murder