missing girl /  बेपत्ता तरुणी चा अवघ्या चार तासात लावला शोध

 

उप निरी विजय साळवे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांच्या मेहनतीला यश

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

दिनांक 26/10/2023 रोजी अमरावती एक्सप्रेस ने मुंबई बडनेरा असा प्रवास करत असताना एक तरुणी आपल्या सोबत असलेल्या बहिणीला व दाजी ला न सांगता शेगाव स्टेशनवर स्मार्ट .

जाग आल्यावर ती न दिसल्याने ते परत शेगाव ला आले व मिसिंग दाखल करून आरपीएफ शेगाव येथे आपली समस्या घेऊन गेले असता उप निरी विजय साळवे व प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रंजन तेलंग यांनी CCTV च्या आधारे तिचा शोध घेतला.

असता ती शेगाव येथे उतरल्याचे दिसून आले नंतर पूर्ण फुटेज पिंजून काढल्यावर ती गजानन महाराज मंदिराकडे जातांना दिसली त्यावरून रंजन तेलंग यांनी आपल्या गुप्तहेर ना याची सूचना दिली व अवघ्या चार तासात त्या 20 वर्षीय तरुणीला तिच्या नातेवाईकांना सुपूर्द केले. फ्लॅट च्या पैशाची व्यवस्था होत नसल्याने टेन्शन मध्ये ती ट्रेन मध्ये उतरून मंदिरात गेल्याचे त्या तरुणीने सांगितले.

रेल्वे सुरक्षा बलाच्या या कामगीरी ने जनतेत एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे  missing girl

Leave a Comment