महायुती ,महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी भरले स्वतंत्र अर्ज
– – – – – – – –
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा
उमरगा : उमरगा नगरपरिषद निवडणूक २०२५ करिता आज दि . १७ अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यन्त नगराध्यक्ष पदासाठी एकुण १७ अर्ज दाखल झाले असुन नगरसेवक पदासाठी २५५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत .
महायुती व महाविकास आघाडी या दोघांच्याही घटक पक्षांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने आघाडी ,महायुती करावयाची असल्यास शेवटच्या दिवशी अपक्षांच्या मनधरणीसह उमेदवाराला पक्षाचाअधिकृत उमेदवार असल्याचे जोडपत्र -२ दिल्याने उमेदवारी काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी मात्र वाढणार असल्याचे दिसते.
.अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोरे , विजयकुमार नागणे ,इमाम जाफर सिकंदर औटी,रजाक अत्तार, संजय पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी ७७ अर्ज दाखल झाले आहेत .
सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवाराचे अर्ज दाखल करून पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याचे जोडपत्र – २ दिल्याने शहरात काही खुशी कभी गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .अनेक ठिकाणी अपेक्षित उमेदवाराला उमेदवारी न देता सिराजस दुसऱ्याच उमेदवाराला जोडपत्र २ मिळाल्याने अनेकांना धक्का बसला आहे
.वास्तविक एका नगरसेवक पदासाठी सहा पक्षासह अन्य अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने कार्यकर्त्यापेक्षा उमेदवारांची संख्या प्रभागात जास्त असल्याचे दिसत आहे . अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास मतदारांचा मात्र मतदान करताना गोंधळ उडणार असला तरी मतदानासाठी अनेक मार्ग खुले असल्याने उमेदवार निवडीचे अनेक पर्याय ही खुले राहणार आहेत .वार्डात प्रभागात काम संपर्क असणारा उमेदवार जड जाऊ शकतो तर जातीय गणिताच्या समीकरणावरच अनेक प्रभागात लढत होणार असल्याची दिसते .
नेत्यांच्या निवडणुकीत आघाडी आणि कार्यकर्त्यांच्या बिघाडी
– – – – – – – – – – –
Nagarparishadnews/नगरपरिषद निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये मात्र महायुती व महाविकास आघाडी न झाल्याने अस्वस्थता दिसत होती .तर अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या निवडणुकीत युती आघाडी होते त्यांना विजयासाठी मार्ग सुकर करून दिला जातो पण कार्यकर्त्याची निवडणूक आली की नेत्यांना आपला इगो किंवा स्वार्थ ,प्रतिष्ठा आडवी येते आणि कार्यकर्त्यांची माती होते अशी सामान्य कार्यकर्त्यांचीं चर्चा होताना दिसत होती .








