प्रतिनिधी :- सचिन वाघे
हिंगणघाट :- नगरपालिकेच्या अध्यक्ष – सर्वसाधारण (महिला) या जागेसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत आज मोठा राजकीय कलाटणीचा क्षण पाहायला मिळाला.
अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या पत्नी जया प्रेम बसंतानी तसेच माजी नगरसेविका छाया चंद्रकांत सातपुते यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
या दोन्ही अपक्ष उमेदवारांच्या माघारीनंतर भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. नयना उमेश तुळसकर यांना पक्षांतर्गत बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता पूर्णत: दूर झाली आहे.
त्यामुळे त्यांची विजयाची दावेदारी पूर्वीपेक्षा अधिक बळकट झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
Nagarparishadnews/अपक्ष उमेदवारांमुळे निर्माण झालेली लढतीची गुंतागुंत आता सुटली असून आगामी निवडणुकीत डॉ. तुळसकर यांच्या बाजूने स्थिती अधिक अनुकूल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.








