Home Blog Page 605

संग्रामपूर शहरात भगत प्लास्टिक यांचे कंत्राट सुरळीत चालू ठेवा -600 नागरीकांनी सह्या करून दिले मुख्याधिकारी यांना निवेदन

0

 

संग्रामपूर शहरात भगत प्लास्टिक द्वारे होत असलेल्या घनकचरा व व्यवस्थापन काम योग्य व्यवस्थितरित्या चालू असण्याबाबत संग्रामपूर शहरातील 600 नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
गेल्या 21ऑगस्ट 2020 पासून संग्रामपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम भगत प्लास्टीक यांना नगरपंचायत अंतर्गत देण्यात आले आहे त्या दिवसापासून संग्रामपूर शहराचा कायापालट झालेला आहे.सर्वीकडे भगत प्लास्टिक आणि त्यांनी नेमलेल्या सफाई कामगारांची वाह वाह होत आहे.नगरपंचायत आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापनाचे अपेक्षेपेक्षा जास्त काम होताना दिसत आहे.सर्व कामे पाहता भगत प्लास्टिक आणि त्यांचे सफाई कामगार यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.संग्रामपूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी भगत प्लास्टीक यांचे खूप प्रयत्न चालू आहेत आणि नागरिक देखील त्यांना सहकार्य करत आहेत.परंतु काही नगरसेवक टेंडर रद्द करण्याचे निवेदन देत आहेत त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी संग्रामपूर शहरातील नागरिकांचे नुकसान होत आहे तसेच भगत प्लास्टिक आणि त्यांच्या सफाई कामगारांनी स्वच्छतेबाबत शहरात जनजागृती करून एकप्रकारे सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे.विशेषतः तहसीलदार संग्रामपूर,सिव्हिल जज,तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक तामगावं पो.स्टे.,तालुका कृषी अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र यांनी देखील भगत प्लास्टिक यांच्या कामाची दखल घेता घनकचरा व्यवस्थापनाचे काम चांगल्याप्रकारे चालू असल्याचे पत्र मुख्याधिकारी यांना देण्यात आले

वरील सर्व बाबींचा विचार करून मा.मुख्याधिकारी यांनी संग्रामपूर शहरात नगरपंचायत अंतर्गत भगत प्लास्टिक यांचे काम योग्य आणि व्यवस्थितरित्या चालू असल्याने त्यांचे कंत्राट रद्द किंवा स्थगित न करता सुरळीत चालू ठेवण्यात यावें असे शहरातील 600 नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स चे पालन करून देण्यात आले.निवेदनात शहरातील प्रतिष्ठित नागरिक,नगरसेवक,डॉक्टर वर्ग,व्यापारी वर्ग तसेच प्रत्येल वार्डातील नागरिकांच्या सह्या आहेत

डॉ.आंबेडकर सभागृह व सभामंडप बांधकामास मंजुरात द्या अन्यथा आमरण उपोषण  – दांडगे  

0

 

संग्रामपुर – येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह व सभामंडपास निधी असून सुध्दा बांधकामास मंजुरात मिळाली नाही या कामास त्वरित मंजुरात द्या अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा उदेभान दांडगे यांनी नगरपंचायतचे मुध्याधिकारी यांना निवदेनाद्वारे दिले आहे.

निवेदनात नमुद की, संग्रामपुर येथील श्री अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रखडलेले कामातील वार्ड क्रमांक ७ मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागेवर सभागृह  व सभामंडप बांधकाम मंजूर निधी असून सुद्धा अद्यापपर्यंत बांधकाम झाले नाही तरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत 2019-20 अंतर्गत तात्काळ बांधकाम 10 ऑक्‍टोबर पर्यंत बांधकामास  मंजुरात न दिल्यास 11 ऑक्‍टोबर रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा असे  उदेभान दांडगे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आले आहे. हया निवेदनात संग्रामपुरातील वार्ड क्र २,३ व ७ मधील नागरिकांनी पाठींबा दर्शविले आहे.

अडगाव येथे शांतता समीतीची सभा संपन्न

0

 

अडगांव बु :प्रतिनिधी दिपक रेळे

कोरोनामुळे यावर्षी सर्वांनी धार्मिक भावना जपून नवदुर्गा उत्सव व दसरा उत्सव साजरा करावा , असे मत गुरुवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ठाणेदार लव्हांगळे यांनी व्यक्त केले . यावर्षी देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीवर बंदी असून , शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील . यात मर्यादित स्वरुपाचा मंडप , चार फूट उंचीची मूर्ती , गरबा , दांडीया वा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम जसे माझे

कुटुंब माझी जबाबदारी , या मोहिमेबद्दल जनजागृती , रक्तदान , रोगनिदान शिबिर व ग्राम स्वच्छता अभियानासारख्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात यावे , असेही ठाणेदारांनी सांगितले . स्थानिक बालाजी मंगल कार्यालयात सोसायटी अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात डॉ . नबी , अशोक घाटे, गजानन मुंगसे , पुंजाजी मानकर , महेबूबखा पठाण , मंगलसिंग डाबेराव , श्रीकृष्ण निमकर्डे , अफरोजखा , प्रल्हाद भोपळे , पुरुषोत्तम निमकर्डे , दीपक रेळे , संजय भटकर , पोलीस जमादार अनंत मुळे , विनोद इंगळे उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन पोका गवई यांनी तर आभार पोलीस पाटील हितेश हागे यांनी मानले .

शेती उपयोगी व घरगुती विज बील संपूर्ण माफ करा . . जिल्हा सरचिटणीस कैसर आझाद शेख

0

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी

सिल्लोड महाराष्ट्र महाविकास आघाडी चे राज्य सरकारने लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळातील शेतकर्याचे शेतीसाठी उपयोगी व घरगुती विज बील संपूर्ण माफ करावे अशी मागणी औरंगाबाद जिल्हा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित दादा पवार आणि उर्जा मंत्री नितीन राऊत, यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन मागणी करण्यात आली असून मा.ना मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे यांनी ईमेल द्वारे कळविले की, सदरील मागणी चे निवेदन पुढील कार्यवाही साठी संबधित विभागाकडे पाठवले असल्याचे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने  कोरोना साथीला रोखण्यासाठी प्रशासनाने दिनांक 23 मार्च 2020 या महिन्या पासून सतत लाॅकडाऊन व संचारबंदी लागू करून तसेच जनता आपापल्या परीने  प्रयत्न करत आहेत. तरी पण औरंगाबाद जिल्हात मोठया प्रमाणात नवीन  रूग्ण वाढत असून ते  जिल्हात 9 नऊ हजारांच्या वर कोरोना साथीचे पाॅझिटीव्ह आढळून आले आहेत. यामुळे शेतकरी, शेतमजुर, हात कामगार, छोटे व मध्यम वर्गीय व्यापारी वर्ग, बांधकाम मजूर , वाहन चालक व सहयोग, आदि नागरिक आर्थिक संकट ग्रस्त होऊन मध्यम वर्गीय नागरिकांचे घरगुती विज बील भरू शकत नाही तसेच शेतकरी  सुध्दा शेतीचे विज बील भरू शकत नाही. त्यांना आपल्या कुटुंबासह जगणे फार कठीण होते आहेत म्हणून शासनातर्फे  त्यांचे घरगुती व शेतीचे विज बील माफ करणे आवश्यक आहेत. परंतु विधूत वितरण कंपनी लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात विजेचे चार महिन्याचे एकदम मोठी रक्कम मे चे बिल देऊन वसूली करत आहेत ते तात्काळ थांबवून महाराष्ट्र राज्य सरकारने माध्यम वर्गीय नागरिकांचे घरगुती व शेतकर्याचे शेती उपयोगी विज बील तात्काळ संपूर्ण माफ करण्यात यावे असे निवेदनात औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कैसर आझाद शेख यांनी संबंधिताना माहीत दिलेचे कळविले आहे.

नो मास्क नो राईड मोहिमेत शहर वाहतूक शाखेची मास्क न घालणाऱ्या 200 चे वर दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

0

 

जफर खान अकोला रिपोर्टर। ,

 

वाहतूक शाखेने मास्क न घालता दुचाकी चालविणाऱ्या चालकां विरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून आज गांधी चौक, कोतवाली चौक, टॉवर चौक, जठारपेठ चौक, रतनलाल प्लॉट चौक येथे मोहीम राबवून 204 मास्क न घालता दुचाकी चालविनाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली, सदर मोहीम शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे कर्मचाऱ्यानी केली, दुचाकी चालक, ऑटो चालक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी स्वतः मास्क घालावे व विना मास्क ची प्रवासी वाहतूक करू नये आढळून आल्यास दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी वाहन चालकांना दिला आहे।

सुनगाव येथील गाव नदीच्या पुलावरून चार चाकी गाडी कोसळून गाडीचे मोठे नुकसान तसेच चालक जखमी…

0

 

सुनगांव प्रतिनिधी:- गजानन सोनटक्के 

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथून रात्रीच्या सुमारास फोर व्हीलर गाडीचा सुनगांव गावनदीच्या पुलावरून खाली पडल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे सविस्तर असे की सुनगांव वरुन येथील संतोष सुंदरलाल राठी जळगांव च्या दिशेने जाणाऱ्या गाडी क्रमांक MH15GR3714 मारोती सुझुकी हि गाडी सुनगांव जवळील गाव नदीच्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावरुन खाली कोसळली त्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन यामध्ये किरकोळ जखमी झाले आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही
.सदर हि घटना दिनांक 7 आक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

 

शेतकऱ्यांना त्वरीत पीक विमा मंजुर करुन आर्थिक मदत द्या – संग्रामपुर तालुका भाजपची मागणी

0

 

 

संग्रामपुर  तालुक्यातील सततच्या पावसामुळे व कीडीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून त्वरीत पीक विमा मंजुर करुन आर्थिक मदत देण्याची मागणी तालुका भाजपच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

तालुकयातील शेतकऱ्यांचे सोयाबीन उडीद मुंग तसेच मका पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच पिक आनेवारी काढण्या संदर्भात विमा कंपनीचे प्रतिनीधी जानुन बुजुन शेतकऱ्यांना वंचीत ठेवण्याचा उददेशाने पीक आनेवारी जास्त़ प्रमाणात काढत आहेत तो प्रकार बंद करावे . पिक विमा मंजुर करुन आर्थिक मदत द्या, यासह विविध मागणीचे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे. हयावेळी  जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख,  तालुकाध्यक्ष लोकेश राठी, गणेश दातीर , अंबादास चव्हाण, पांडुरंग हागे, रामदास म्हसाळ , विलास इंगळे, सुभाष हागे, नारायण अवचार ,पांडुरंग इंगळे, यासह तालुकयातील बहुसख्य़ भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ! तेल्हारा तालुका मंडप बिछायत असोसिएशनचे धरणे आंदोलन आणि शांती मार्च संपन्न

0

 

प्रतिनिधि: दिपक रेळे

रोजगार ठप्प झाल्याने कोरोनाने नव्हे तर उपासमारीने मरण्याची वेळ व्यावसायिकांवर येऊन ठेपल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तेल्हारा तालुका मंडप, बिछायत, डेकोरेशन, साऊंड,असोसिएशन आणि विवाह सेवा संघर्ष समिती
यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शांती मार्च आणि तहसील कार्यालय तेल्हारा येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

सविस्तर असे की, मार्च महिन्यापासूनच कोरोनाच्या प्रकोपामुळे सर्व प्रकारच्या विवाह संबंधी तसेच मांगलिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक अशा सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांवर शासनाचे अनेक निर्बंध असल्यामुळे मंडप, बिछायत, डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस, केटरिंग, आचारी, वाजंत्री, बँड पार्टी वाले, बग्गीवाले, घोडेवाले, फ्लॉवर्स मंगल कार्यालय, इत्यादी सर्वच प्रकारचे व्यवसाय ठप्प झाले असून ह्या सर्वांवरच उपासमारीची वेळ आलेली आहे. अनेकवेळा शासनास निवेदने देऊन आणि गाऱ्हाणे मांडून सुद्धा शासनाने यांच्या मागण्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि व्यथा मांडण्यासाठी विवाह सेवा संघर्ष समिती आणि तेल्हारा तालुका मंडप बिछायत, डेकोरेशन साऊंड लाइटिंग असोसिएशन तेल्हारा रजि. नंबर 159/2020 यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 ऑक्टोबर 2020 बुधवार रोजी शासनाचे सर्व नियम पाळून मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करून सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालय तेल्हारा पर्यंत शांती मार्च काढून तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन अत्यंत शांततामय मार्गाने व कायदा हातात न घेता करण्यात आले. नंतर तहसीलदार साहेबांमार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले. शासनाने तात्काळ मागण्यांची दखल न घेतल्यास सर्वांवर आत्महत्येची वेळ येणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रम आयोजन वरील निर्बंध तात्काळ उठवावेत,
सन 2020 मध्ये ठप्प झालेल्या व्यवसायामुळे झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या नुकसानीची भरपाई शासनाने मदतीच्या स्वरूपात व्यवसायिकांना करावी. पूर्ण क्षमतेने व्यवसाय करण्याची मुभा शासनाने त्वरित द्यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सदर आंदोलनात बहुसंख्य मंडप, बिछायत, डेकोरेशन, साऊंड, लायटिंग, मंगल कार्यालय, केटरिंग, आचारी, फ्लॉवर्स, फोटोग्राफर्स, घोडेवाले, बग्गी वाले बँड पार्टी वाले आणि मजूर वर्ग आणि सर्व संबंधित व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव जा तालुक्यात मडाखेड येथे वाघांच्या जोडीची हजेरी सुरक्षेसाठी वनविभागाला गावकऱ्यांचे निवेदन

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड चावरा येनगाव शिवारात दोन वाघाची जोडी वावरत असून अनेक लोकानी त्याना पाहिले असल्याचे ठाम आणि खात्रीशीर मत आहे असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन पणन महासंघाचे संचालक प्रसेनजीत जी पाटील यांच्या लेटर हेड वरून वनविभागाला दिले असून संबंधित शीवारातील अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुगीचे दिवस असताना सोयाबीन कपाशी मका व इतर पिके काढनिवर आलेले आहेत आशा वेळी शेतकरी शेतमजूर शेतावर जाण्यास धजावत नाही कारण या श्वापदांमुळे हरिणी आणि शेळी यांच्या शिकारी झालेल्याचे अवशेष जनतेने तसेच प्रत्यक्ष वनविभागाने पाहिलेले आहेत तरीही जनतेच्या सुरक्षेबाबत उपाययोजना केलेली नाही camera लावणे सापळा पिंजरा शॉप लावणे स्टॉल लावणे ई .ची उपाययोजना करावी अन्यथा होणाऱ्या जीवित हानीस संबंधित विभाग आणि शासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे..

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची अत्यंत दुरावस्था झाली असून, जागोजागी पडलेले खड्डे चुकवितांना अपघात घडत आहेत.

0

 

 

 

अपघातामध्ये अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अक्षरश: या मार्गाची चाळणी झाली असून याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत आहे. या विरोधात आज ७ ऑक्टोबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून निषेध नोंदविण्यात आला. तसेच महामार्गावरील अपघातांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या महामार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली आहे. मलकापूर-नांदुरा जाणाNया या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या महामार्गावर नेहमी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरात मिळाली असून रस्ता कामाला सुरूवात सुध्दा झाली होती. मात्र, चार वर्षापासून या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. नागपूर ते मुंबई हा मोठा महामार्ग असून या महामार्गावर शेकडो वाहन ये-जा करतात. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांनी आता मोठे रूप धारण केले आहे. अचानक वाहन खड्ड्यातून गेल्यास वाहन अनियंत्रित होवून अपघात होत आहे. विशेष करून दुचाकी चालकांसाठी ते अतिशय धोकादायक ठरले आहे. याकडे संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यामध्ये बेशरमचे झाड लावून निषेध नोंदविण्यात आला. तर या अपघातांना तसेच रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणाNया संबंधित अधिकारी, ठेकेदार यांचेवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून महामार्गाचे काम तात्काळ सुरू न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करून प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी उपजिल्हा प्रमुख अजय टप, तालुका प्रमुख अजित पुंâदे, शहर प्रमुख शालीकराम पाटील, बळीराम बावस्कार, युवा प्रमुख अमोल बावस्कार, मयुर बुडुकले, अर्जुन पाटील, शितल जांगडे यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.