Home Blog Page 101

बिबी परिसरामध्ये साथीच्या रुग्णात वाढ आरोग्य विभागाने दखल घेण्याची गरज.( brekingnews )

0

तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:बिबी परिसरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले असून.डोकेदुखी, सर्दी, ताप, खोकला, संडास, उलटी, व्हायरल इन्फेक्शन च्या साथीने रुग्ण बेजार आहे ,

सध्या पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र डास ,मच्छर यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन मुळे बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

परंतु बिबी ग्रामीण रुग्णालयात तीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी पदावर असून सुद्धा दोन डॉक्टर स्वतःच्या सोयीनुसार नोकरी करत असल्याची चर्चा रुग्ण नातेवाईकांकडून होत आहे.

एमबीबीएस डॉक्टर नियमित उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. व आयुष विभागाच्या डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार घेऊन समाधान माणून माघारी फीरावे लागते व खाजगी उपचार घ्यावे लागत असून गोरगरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

तसेच बीबी येथे पोलीस स्टेशन असल्यामुळे आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांकडून होणे गरजेचे असते तसेच ज्येष्ठ नागरिक, अपंग, शाळकरी मुलं यांना फिटनेस साठी नियमित वैद्यकीय दाखल्याची गरज असते मात्र येथे एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी हजर राहत

नसल्यामुळे तीस किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय तपासणी दाखले आणावे लागत असल्याचा मनस्ताप ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनातेवाईक सर्वांनाच होत आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तरी संबंधित आरोग्य विभाग दखल घेईल का ? याकडे रुग्ण नातेवाईक जनतेचे लक्ष लागून आहे.

brekingnews: तपासणीसाठी आयुष विभागात झालेली महिला ,पुरुष जेष्ठ नागरिक ,बालक गर्दी. तर भरती असलेले रुग्ण .

यावल तालुक्यात खाजगी सेतू सुविधा केंद्र चालकांचा मनमानी कारभार बंद करा ग्रामपंचायत ऑपरेटर यांची मागणी (  grampanchayatnews )

0

 

यावल( प्रतिनिधी )विकी वानखेडे

grampanchayatnews:यावल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधून असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातून शासनाने नेमून दिलेल्या ४०० पेक्षा जास्त केन्द्रांच्या माध्यमातुन सुविधा ग्रामीण नागरीकांना दिल्या जात.

असताना तालुक्यातील खाजगी आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दिलेल्या सीएससी आय डी महाऑनलाईन वापर करून नेमून दिलेले क्षेत्र सोडून तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध कामे करत नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत शासनासह नागरीकांची फसवणूक करत.

असल्याने खाजगी आपले सरकार सेवा केंद्र चालकांची चौकशी करून त्यांचे वर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील ग्रा. पं. सेवा केंद्र चालकांनी येथील गटविकास अधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधून असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रातून शासनाने नेमून दिलेल्या ४२० पेक्षा जास्त सुविधा ग्रामीण नागरीकांना दिल्या जात.

असताना तालुक्यातील खाजगी आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दिलेल्या सीएससी आय डी महा ऑनलाईन वापर करून नेमून दिलेले क्षेत्र सोडून तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैध कामे करत नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत शासनासह नागरीकांची फसवणूक करत.

असल्याने याचा रोष ग्रामीण पातळीवरील गावातील ग्राम पंचायतच्या आपले सरकार सेवा केन्द्रातून माफक सेवा देणाऱ्या केंद्र चालकांना सहन करावा लागत आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की खाजगी सेवा केंद्र चालकांवर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याने त्यांना सेवा केन्द्राच्या माध्यमातुन गैरप्रकार करण्यास वाव मिळत आहे.

यामध्ये शासकीय ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र बदनाम होत असल्याची तक्रार निवेदनात केली असून त्यांचे वर तात्काळ योग्य दंडात्मक कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावल तहसीलचे निवासी तहसीलदार संतोष विनंते यांना दिलेल्या निवेदनावर न्हावी तालुका यावल ग्रामपंचायतीचे संजय तायडे, रौनक तडवी परसाळे, प्रभाकर तायडे बामणोद, विठ्ठल कोळी मनवेल, विजय बाविस्कर साकळी, गोकुळ तायडे म्हैसवाडी, सुजाता ढाके किनगाव बुद्रुक,  वड्री, पुनम धनगर किनगाव खुर्द, विजय बाविस्कर साकळी ,

grampanchayatnews:सुलतान पटेल पाडळसा ,जिवन भंगाळे अंजाळे, दिपमाला पारधे हिंगोणा, राकेश कोल्हे वढोदे प्रगणे सावदा, अर्चना काटे शिरसाड , दिलीप धनगर सांगवी , सतिष गावंडे थोरगव्हाण,अरकान तडवी नायगाव ,वसीम तडवी कासारखेडा,आकाश चौधरी बोरखेडा बु , संजय कपले आमोदा, यांचे सह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केन्द संचालकांच्या सह्या आहेत

शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे माता पिता पालक शिक्षक सभेचे आयोजन !!!( Yavalnews )

0

 

. यावल तालुका प्रतिनिधी :- विकी वानखेडे

दिनांक 6 जुलै 2024 शनिवारी शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी येथे माता पिता पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर जे महाजन हे होते तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस जे पवार, बी ई महाजन, सदाशिव पी निळे, जी एल चौधरी,आर सी जगताप माता पिता पालक हे उपस्थित होते.

यावेळी माता पिता पालक शिक्षक यांची कार्यकारणी निवड पुढीलप्रमाणे आर जे महाजन (अध्यक्ष)मिलिंद साहेबराव जंजाळे (पिता-पालक उपाध्यक्ष )वंदना नितीन सुतार (माता-पालक उपाध्यक्षा) एम ए महाजन( सचिव)संतोष भाऊलाल बाविस्कर सहसचिव देवानंद सुरेश लोधी सदस्य प्रीती भरत लोधी- सदस्य भारती प्रवीण जैन- सदस्य स्वाती हेमंत जोशी -सदस्य रेखा रामदास बडगुजर -सदस्य यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

यावेळी नवनिर्वाचित कार्यकारणीचे मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक एस जे पवार यांनी केले.

यानंतर विद्यालयातील उपशिक्षक बी इ महाजन यांनी खेळीमेळीच्या वातावरणात पालकांशी विषयवार चर्चा केली
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर जे महाजन यांनी स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास , अभ्यासाचे नियोजन, याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी एल चौधरी यांनी केले तर आभार आर सी जगताप यांनी मानलेत. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Yavalnews:विशेष म्हणजे मिलिंद साहेबराव जंजाळे यांची साकळी पंचोकृषित प्रथमच माता पिता शिक्षक पालक या समितीत शिक्षण विभागात अनु. जातींचे तसेच पत्रकार, त्याच प्रमाणे फुले शाहु आंबेडकर विचारधारेचे मिलिंद जंजाळे यांची शारदा विद्या कनिष्ठ महाविद्यालय माता पिता शिक्षक समन्वयक समितीमध्ये एकमताने उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्याचे संपूर्ण जाती धर्मातून अभिनंदन केले जात आहे

भारतीय कायद्यात झालेला बदल आपण स्वीकारला पाहिजे – सपोनी संतोष चव्हाण ( policenews )

0

 

विकी वानखेडे यावल / जळगाव

policenews:भारतीय कायद्यात झालेला बदल हा आपण स्वीकारला पाहिजे ग्रामीण भागात कायद्याचे नियमांचे पालनही अधिक काटेकोर पणे केले पाहिजे यात फौजदारी कायदा,भारतीय पुरावा कायदा , हिट अँड रन ,मॉब लिचिंग या कायद्यात झालेला बदल तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देखील काही विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत.

एखाद्याला जामीनदार होण्यासाठी देखील आपण त्याबाबतची माहिती ठेवने आवशयक आहे. जूने गुन्हे देखील आता नवीन कायद्याने चालणार आहे.रस्ता अपघात यातही बदल झालेला आहे.

प्रत्येकाने गाडीचे कागदपत्रे व्यवस्थितपणे ठेवणे गरजेचे आहे. गुन्हेगारास पळवाटा कमी आहेत. गाडीचा अपघात होऊन पळाला तर त्याला जामीन ही लवकर मिळणार नाही.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

आहे अशी माहिती अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी दिली यामुळे आपण स्वतः ही या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि सोबतचे नातेवाईक यांना देखील याविषयीची माहिती द्यावी.

तसेच शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांनी तर गुन्हेगारी प्रवृत्ती पासून दूर रहावे अशी मागणी सपोनी चव्हाण यांनी दिली अजूनही गावा गावात कोर्टा मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याबाबत असे की चोपडा तालुक्यातील धानोरा येथील ग्राम पंचायत कार्यालयात दिनांक ६ रोजी संध्याकाळी अडावद पोलीस ठाण्याकडून नवीन कायद्याविषयी ची माहिती देण्यात आली

policenews:यावेळी अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण माजी उपसभापती माणिकचंद महाजन सरपंच रज्जाक तडवी उपसरपंच विजय चौधरी भुसावळ पतपेढी संचालक प्रशांत सोनवणे पोलीस हवालदार नाशीर शेख सतीश भोई ग्राम पंचायत सदस्य सावन महाजन रवींद्र शिरसाठ क्रीडाशिक्षक देविदास महाजन पोलीस पाटील रविंद्र कोळी सावदा तलाठी रशीद तडवी राजू पाटील आरिफ तडवी आशाबाई बोदडे हितेंद्र पाटील दिपक गुजर प्रवीण कोळी सिकंदर तडवी विजय पाटील जितेंद्र कुंभार मस्तुफा शेख तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होते

शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.( formernews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

बीबी, कीनगाव जटुटु,भुमराळा परिसरात वन्य प्राण्यांची संख्या खूपच वाढली असून जंगली प्राण्यांचा जास्तच उद्रेक वाढला आहे .त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.

तरी संबंधित वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरीही बीबी, कीनगाव जटुटु,भुमराळा महसूल मंडळात समाधानकारक पाऊस झालेला नसला तरीही शेतकरी कुठवर वाट पाहणार या आसेने सावकाराचे बँकेचे कर्ज काढून सोयाबीन, कपाशी, तूर , मुंग, उडीद अशा पिकांची पेरणी केली आहे.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

मात्र पीक जमिनीच्या वर येताच वन्यप्राणी या पिकाची नासाडी करीत आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्याला सावकाराचे ,बँकेचे कर्ज काढावे लागले ते येणाऱ्या पिकाच्या आधारावर फेडायचे असते ,मात्र शासन शेतकऱ्याला फक्त घोषणा देत आहे .

त्या पाठोपाठ वन्यप्राणीही शेतकऱ्याची पाठ सोडायला तयार नसून मोठ्या प्रमानात नीलगाय ,रोहि, हरीन रानडुक्कर, माकड मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला असून चिंतातूर झाला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.( formernews )

खरीप हंगामात सुद्धा शेतकऱ्यांला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

formernews:तरी वन विभागाने वन्य प्राण्यांची प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी आणि वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत असून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई तात्काळ लवकरात लवकर वन विभागाने द्यावी .अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार आणी युवक कल्याण व क्रीडा केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे केन्द्रात मंत्री झाल्यावर प्रथम आगमन झाल्यावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन उत्साहाच्या वातावरणात स्वागत सत्कार करण्यात आले.

केन्द्रीय मंत्री रक्षा खडसे या चोपडा येथे कार्यक्रमास जात असतांना यावल येथील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विनंतीला मान देऊन त्या यावल शहरातील भुसावळ टी पाँईटवर स्वागत स्विकारण्यासाठी काही वेळ थांबल्या होत्या.

यावेळी माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, भुषण फेगडे , भाजपाचे शहराध्यक्ष राहुल बारी, योगेश चौधरी, सचिन मोरे, उज्वल कानडे, स्नेहल फिरके, सागर चौधरी, अनिकेत सोरटे, मनोज बारी, दिपक फेगडे यांच्यासह मोठया संख्येत पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

 

rakshatai khadse:या धावत्या भेटीत केन्द्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आपल्या पक्षाचे पदधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून यावल तालुक्यातील समस्यांविषयी विविध शासकीय कार्यालयांशी संबधित अधिकाऱ्यांशी त्यांनी स्वता भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करीत तातडीने समस्याचे निराकरण करण्याविषयी सुचना दिल्यात

सैलानी मध्ये भोंदू बाबाचा ‘पर्दाफाश’,अन् पोलिसांनी केलं ‘स्टिंग ऑपरेशन’ जादू टोना प्रतिबंध कायदा नुसार रायपूर ठाण्यात पहिला गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

जावेद शाह बुलढाणा

crimenews:रायपूर. सैलानी दर्गा येथे भोंदू बाबांचा हैदोस वारंवार वाढत चाललेला आहे त्याला आढा घालण्या साठी रायपूर पोलिसानी कंबर कसली आहे नुकतीच एक घटना घडली आहे.

घटना अशा प्रकारे आहे की, यातील नमुद आरोपी -इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी याने फिर्यादी- सौ.सुमनबाई विठठल जाधव, वय 72 वर्षे धंदा-शेती जात बंजारा
रा.येनोली तांडा. जिंतुर जि.परभणी. यांचा नातु विकी पुडंलिक जाधव यांचेवर सैलानी बाबा दर्गा येथे जंतर मंतर करून त्याचे आंगावर लिंबु कापून उतरून घेवून पैशाची
मागणी करून भिती दाखवून फसवणुक केली.

व फिर्यादी. यांचे नातावाचे हात पायाला बेड्या टाकून
साखळी ने बांधून अघोरी उपचार करून पिळवणुक केली आहे फिर्यादी यांचे तोडी रिपोर्ट वरून भोंदू बाबा इरफान शहा रमजान शहा रा. सैलानी यांच्या विरुद्ध कायमी अप.क्रं. 148/24 कलम 3(1).3(2) महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रतीबंध घालण्या बाबत व तयांचे समुळ उचटन करणे बाबत अधिनियम 2013 नुसार गुन्हा
दाखल केला आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

यात पो स्टे चे राजेश गवई व ओमप्रकाश साळवे यांचा सहभाग होता. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक कडासने साहेब , पोलिस उपअधीक्षक महामुनी साहेब, dysp सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तपास api दुर्गेश राजपूत करीत आहेत ..

सैलांनी मध्ये या पूर्वी कधीच जादूटोणा प्रतिबंधक कायदा बाबत कोणताही गुन्हा दखल नसून सदरची घटना ही पहिलीच असून या पुढे देखील असे आघोरी प्रकार बोंधू बाबा आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच जनतेला आव्हान आहे की अशा भोंदू बाबा यांना कोणताही प्रतिसाद न देता यांना बळी ना पडता रुग्णावर वैद्यकीय उपचार करावे तसेच बाबा दर्गा चे फक्त दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना करावी ..

crimenews:तसेच अशा बाबा विरुद्ध समोर येऊन पोलिसांना माहिती द्यावी ..तसेच रायपूर पोलीस देखील याबाबत कठोर कारवाई करीत आहे..

शाळा आरंभ दिवस उत्साहात साजरा व माता पालकांचा गौरव…!जिल्हा परिषद मरेगाव शाळेचा उपक्रम.( newsupdate )

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

newsupdate:गडचिरोली:-पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत अभिंर्झा केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मरेगाव येथे आज शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोनच्या शुभ पर्वावर विविध उपक्रम राबविण्यात आले.उन्हाळी सुट्‌या संपून विदर्भातील सर्व शाळा 1 जुलै पासून सुरु झाल्या.

त्या निमित्त्याने दिनांक 1 जुलै ला जि प उच्च प्राथ शाळा मरेगाव येथे शाळा आरंभ दिन शाळा प्रवेशोत्सव नवागतांचे स्वागत कार्यक्रम घेण्यात आला.या निमित्याने सकाळी गावातून शैक्षणिक प्रभातफेरी काढण्यात आली.

यामध्ये सर्व भरती पात्र बालकांच्या घरा पर्यत प्रभातफेरी नेवून सजविलेल्या बैलबंडीत नवागतांना बसवून शाळेत आणण्यात आले.शाळेच्या प्रवेश ‌द्वारावर त्यांचे पाय धुवून औक्षण करण्यात आले. शाळेच्या दुतफो उभे असलेल्या वि‌द्याथ्यर्थ्यानी नवागतांवर फुलांचा वर्षाव केला.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वि‌द्यार्थ्यांना फुलांचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.सोबतच मोफत पाठ्यपुस्तके,बुट व चाकलेट देवून स्वागत करण्यात आले.तसेच शाळा पूर्व तयारी मेळाव्यातील सात स्टालच्या माध्यमातून नवागत बालकांची कृतियुक्त गुणवत्ता तपासण्यात आली.

गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या प्रेरणेतून कार्यक्रम घेण्यात आले.सोबतच केंद्र प्रमुख यांचे सहकार्य लाभले.
मागील शैक्षणिक सत्रात वर्ग 1 ली च्या माला पालकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यास शाळेला सहकार्य केले त्याबद्दल शाळेतील शिक्षिका सौ मंगला सुरकार यांनी सर्व मातांना साडी व चोळी देवून मान्यवरांच्या हस्ते शाळेतर्फे गौरव करून इतर सर्व माता व पालकांना शैक्षणिक कार्याची प्रेरणा दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कार्यक्रम निमित्याने शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक गुणवंत हेडाऊ यांनी प्रास्ताविकातून माता पालकांना,वि‌द्यार्थी दैनदिन उपस्थिती शालेय गुणवत्ता वाढ,विविध शालेय योजना यांचे मार्गदर्शन केले. मान्यवरांनी शाळेबद्दल मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला गावच्या सरपंचां सौ आविका मडावी, उपसरपंच श्री नेताजी अलाम.ग्रा.पं.स. नितीन टेकाम, शा.व्य.स. अध्यक्ष अडभंगी बावणे,उपाध्यक्षा सौ शितल हरडे, सदस्य श्री अविनाश सेलोटे, सौ विद्या दिवटे, सौ. अलाम,श्रीमती येरमे, अंगणवाडी ताई श्रीमती कांबळे,गावातील इतर मान्यवर तसेच वर्ग 1 ते 7 च्या माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

newsupdate:सौ सुरकार ताई यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.आभार कु. टेकाम ताई यांनी मानले तर कार्यक्रम पार पडण्यासाठी श्री मडावी सर यांनी सहकार्य केले

तेलंगणात काँग्रेस सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला, महाराष्ट्रातही कर्जमाफी व्हावी,रयत शेतकरी संघटनेची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कृषिमंत्र्याकडे मागणी (Buldhananews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

Buldhananews:तेलंगणात काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी, शेतकरी रयत संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके


महाराष्ट्र :तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषिमंत्री यांचे कडे रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केलं आहे.

याआधी कर्जमाफी करण्यात आली मात्र, त्यात अटी शर्ती इतक्या लागू केल्या की लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते.

त्यामुळं आता जर सरकार कर्जमाफी करणार असेल तर अटी शर्तींच्या बाबतीत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक करु नये असे पुर्णाजी खोडके म्हणाले…

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

तेलंगणामधील काँग्रेस सरकारने 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंथा रेड्डी यांनी 31 हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती. त्याप्रमाणं सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

तेलंगणा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यात 34 हजार कोटी रुपयांच्या कृषी कर्ज माफीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी दिले आहे…..

शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारनं चांगली योजना राबवावी

https://youtu.be/CQjoFXhVtqA?si=cCWxNagRJjs3KCDu

तेलंगणा सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली आहे. राज्यात शेतकरी संपानंतर आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दोन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र, अटी शर्तींमुळं अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असल्याचे पुर्णाजी खोडके म्हणाले. लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब उमटल्याचे खोडके म्हणाले.

बातमी सविस्तर पहा  लाईव्ह 

आता पुन्हा एकदा राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार अशी चर्चा सुरू आहे. मागील दोन कर्जमाफीच्या वेळी झालेला घोळ पाहता अगोदरच्या कर्जमाफीत पात्र शेतकऱ्यांचा आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांचा शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा असे खोडके म्हणाले. जे अपात्र ठरले त्या त्रूटी दूर कराव्यात.

Buldhananews :तसेच कर्जमाफीची नुसती घोषणा करु नये, तर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे ईमेल पाठवून द्वारे मागणी केली आहे…

आंतरजातीय प्रेम विवाह केल्याचे कारणावरून दोन गटात हाणामारी दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

यावल : विकी वानखेडे

crimenews:आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून बुधवारी पावणे अकरा वाजेचे सुमारास येथील बस स्थानक समोर दोन गटात वाद होऊ तुफान हाणामारी झाली यात दोन्ही गटाकडील प्रत्येकी एक एक जण असे दोन जण जखमी झाले आहेत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या.

असून एका गटातील अठरा आरोपींविरुद्ध तर दुसऱ्या गटातील ११ जणांविरुद्ध अशा २९ जनाविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आकाश मधुकर बिऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी आंतरजातीय प्रेमविवाह केला असून या विवाहास पत्नीच्या कुटुंबाकडून प्रचंड विरोध आहे.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

आंतरजातीय विवाह केल्याने पत्नीच्या नातेवाईकाकडून रस्त्याने जाता येता शिवीगाळ व जिवे ठार मारण्याचे धमक्या दिल्या जात होत्या. मात्र पत्नीचे नातेवाईक असल्याने व तिचे सांगण्यावरून मी पोलिसात फिर्याद दिली नव्हती. २६ जून रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मी यावल बस स्टॅन्ड कडे माझी खाजगी कामानिमित्ताने जात असताना बस स्टॅन्ड समोर प्रवीण उर्फ पल्या सुरेश बारसे, निलू सुरेश बारसे व अन्य १६ जनांनी माझी मोटरसायकल अडवत माझेवर बंदुक रोखत अचानक मला पकडून गाडीवरून ओढून खाली पाडले

त्याच वेळी हातातील लोखंडी फायटरने छातीवर पाठीवर जोरजोराने मारहाण करून सुरुवात केली . इतरांनी लाथा बुक्क्यांनी तुडविले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादित नोंद असून १८ संशयित आरोपी विरूध्द भादवि कलम३०७ सह, आर्म अॅक्ट ३,२५ सह दंगली चा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परस्पर विरोधी गटाकडून चंद्रकांत ऊर्फ अजय नेमीचंद सारसर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी यावल नगरपालिकेत सफाई कर्मचारी असून माझेसोबत प्रविण सुरेश बारसे हा सफाई कर्मचारी होता आम्ही दोघे बस स्टॅंड चौकात साफसफाई करत असताना आकाश मधुकर बिऱ्हाडे हा त्याचे मोटर सायकलने आमचे जवळ येवून ए साले ए साले आम्हाला चिडवू लागला आम्ही त्याला सांगितले.

की, लोकांसमोर तु आम्हाला असे हिनवू नकोस आमची इज्जत कमी होते. तेव्हा आकाश त्यांच्या साथीदारांनी आम्हाला पुन्हा शिवीगाळ करत आम्हाला शिवीगाळ करत फायटरसह लाथा-बुक्यांनी मारहाण केली.

crimenews:फिर्यादीत आकाश मधुकर बिऱ्हाडे यांचेसह ११ संशयित आरोपींचा समावेश आहे.पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली यावल पोलीस तपास करीत आहे.