Home Blog Page 12

Dharashivnews /भाऊसाहेब बिराजदार बँकेने लाभांश तर कारखान्याने साखर वाटत दिवाळी केली गोड

0

 

बातमीदार ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. उमरगाच्या वतीने सन २०२४ -२५ सालाचा १०% लाभांश बँकेच्या सभासदांना अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर देण्याचा निर्णय चेअरमन प्रा सुरेश दाजी बिराजदार जाहीर केला होता .

तसेच भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या सभासदांना साखर दि १७ पासून वितरण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे .दीपावली व पाडव्याच्या निमित्ताने सर्व शेतकरी सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याचे चेअरमन सुरेश बिराजदार यांनी जाहीर केले आहे .

धाराशिव जिल्हा तसेच उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे अत्यंत अडचणीत सापडला असल्याने भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेत चेअरमन प्रा सुरेश बिराजदार यांनी सभासदांना १०% लाभांश देण्याचे जाहीर केले होते .त्याप्रमाणे भाऊसाहेब बिराजदार बँकेच्या सर्व सभासदांचे लाभांश त्यांच्या खात्यावर जमा होत आहेत .भाऊसाहेब बिराजदार बँकेत ज्यांचे खाते नाही त्यांनी खाते काढून घ्यावे .ज्यांची केवायसी झालेली नाही अशांनी कागदपत्रांची पूर्तता करून खाते चालू करून घ्यावेत .

असे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शहापुरे यांनी सभासदांना केले आहे . तसेच कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सर्व शेतकरी सभासदांना सवलतीच्या दरात साखर वितरण करणार असल्याचे जाहीर केले होते त्याप्रमाणे दि १७ पासून या साखर वाटपाचा शुभारंभ समुद्राळ येथील कारखान्यावर करण्यात आला आहे .

Dharashivnews /दि २० पर्यंत ही साखर वितरण होणार असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दीली आहे .यामुळे भाऊसाहेब बिराजदार बँक व भाऊसाहेब बिराजदार कारखान्याच्या सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .

Bjpnews /संत ज्ञानेश्वर वॉर्डातील महिलांचा आ. समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट, दि. १८ ऑक्टोबर २०२५ :
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार व कार्यसम्राट आ. समीर कुणावार यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन शहरातील संत ज्ञानेश्वर वॉर्डातील असंख्य महिला व युवा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

मारोती सहारे व कविता सहारे यांच्या नेतृत्वात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात महिलांचा विशेषतः मोठा सहभाग पाहायला मिळाला.
या पक्षप्रवेशात वनिता वानोडे, माया मांडवकर, विशाखा बेदुरकर, उषा गहलोत, रोशनी गहलोत, मंजुषा भालकर, लक्ष्मी देशमुख, वंदना डाखोरे, छाया खडतकर, शोभा लिबाडे, जयश्री घाटुर्ले, पायल ठोंबरे, शिल्पा कर्नाके, प्रियांका उरकुडे, सुषमा सहारे, रुपाली तराळे, नीलिमा मिसरकर, माया राऊत, मेघा मसराम, धनश्री कर्नाके, सविता कर्नाके, मनिषा पोहनकर, रूपाली भजभूजे, ज्योती चंदनखेडे, चैताली चंदनखेडे, ज्योती वाघमारे, प्रेमीला जांभूळे, चिंतामण मांडवकर, मोहन वानोडे, शालिक जांभूळे, प्रभाकर तिवाडे, रामदास कुंभारे, पुरुषोत्तम मिसरकर, माया कामडी आदींचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला आ. समीर कुणावार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत भाजपा अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम, भाजपा शहराध्यक्ष भूषण पिसे, शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, मारोती सहारे, शरद कोणप्रतिवार, देवा वाघमारे, सुनील करणाके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमात आ. कुणावार यांनी सर्व नविन कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करत त्यांना पक्षाचा शेला प्रदान करून सन्मानित केले.

Bjpnews /यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, भाजपाचे ध्येयधोरण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.

Sharadpawar/राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ‘काळी दिवाळी’ करून सरकारचा तीव्र निषेध

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे अपुरे व दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे वर्धा जिल्ह्यात ‘काळी दिवाळी’ साजरी करत तीव्र निषेध करण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले आणि जेष्ठ नेते सुनिल राऊत यांनी केले.
या वेळी बोलताना वांदिले म्हणाले, “सातबारा कोरा करू म्हणणारे आज कर्जमाफीचं नावही घेत नाहीत. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम सरकार करत आहे.”

पक्षाच्या प्रमुख मागण्या सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹75,000 प्रोत्साहनपर मदत
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50,000 नुकसानभरपाई जनावरांच्या मृत्यूबाबत ₹70,000 पर्यंत भरपाई गाळ भरलेल्या विहिरींसाठी प्रती विहीर ₹1 लाख मदतमजुर कुटुंबांना ₹25,000 रोख मदत
घरांचे नुकसान झालेल्यांना पीएम आवास योजनेच्या बाहेर दीड लाखांची मदत
विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे
वांदिले यांनी सांगितले की, “सरकारने पॅकेज जाहीर करताना पीक विमा योजना आणि त्यातील ‘ट्रीगर’ बदलले, यामुळे शेतकऱ्यांच्या हातून हजारोंची रक्कम गेली आहे.”

उदाहरणार्थ, सोयाबीनसाठी ₹49,300, कापसासाठी ₹51,000 मिळू शकले असते, परंतु सरकार केवळ ₹8,500 ची तुटपुंजी मदत करत आहे, ही थट्टा आहे, अशी टीका त्यांनी केली.
या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपस्थितांमध्ये जिल्हा व शहर स्तरावरील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Sharadpawar /सरकारची ‘बौद्धिक दिवाळखोरी’ उघड झाली आहे. अन्नदात्याची थट्टा सहन केली जाणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सरकारवर केली टीका
प्रतिक्रिया –अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष, रा.कॉं.पा. (शरद पवार गट)”सत्तेच्या मस्तीत बुडालेल्या बहिऱ्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही. म्हणून आज आम्ही काळी दिवाळी साजरी केली. अन्नदात्याच्या व्यथेशी आम्ही आहोत

Breakingnews//हिंगणघाटमध्ये वाढती व्यसनाधीनता – जबाबदार कोण? समाज, नेते की आपण स्वतः?

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शहरात सध्या युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मद्य, तंबाखू, गुटखा, गांजा, मेफेड्रान(एम. डी) यांसारख्या व्यसनांच्या आहारी जाऊन अनेक तरुणांचे आयुष्य अंधारात ढकलले जात आहे. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. या गंभीर स्थितीच्या मुळाशी नेमके कोण आहे, हा प्रश्न आता समाजासमोर उभा ठाकला आहे.

नेते जबाबदार की समाज?प्रत्येक निवडणुकीच्या काळात काही नेत्यांकडून मतांसाठी नशेच्या वस्तूंचे वितरण केले जाते, हे उघड गुपित राहिलेले नाही. त्यातूनच अनेक युवक पहिल्यांदा व्यसनाच्या विळख्यात अडकतात. हीच तरुण पिढी पुढे कायमस्वरूपी व्यसनाधीन बनते आणि त्यांचे जीवन मार्गभ्रष्ट होते.

ज्यांच्याकडून समाजाला दिशा मिळायला हवी, तेच नेते जर अशा कृत्यांना प्रोत्साहन देत असतील, तर समाजाचे भवितव्य काय? नागरिकांचीही जबाबदारी नाकारता येणार नाही नेत्यांच्या चुकीच्या वागणुकीला विरोध न करता, आपणच त्यांना पुन्हा निवडून देतो. व्यसनाचे सामाजिक परिणाम दिसूनही मौन बाळगतो.

त्यामुळे ही जबाबदारी केवळ नेत्यांवर न ठेवता, आपल्यालाही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.
स्थानिक नेतृत्व कुठे आहे?
हिंगणघाट शहरातील अनेक प्रभागांमध्ये स्थानिक नगरसेवक किंवा नेते या विषयावर बोलायला तयार नाहीत. व्यसनाधीनतेमुळे युवकांचे होणारे नुकसान, कुटुंबांतील तणाव, गुन्हेगारी वाढ याकडे दुर्लक्ष केले जात आहे. समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर भाष्य न करणारे नेतृत्व म्हणजे निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण नाही का?
समाधानाचा मार्ग – सजग नागरिक, जबाबदार नेते
निवडणुकीत प्रलोभन देणाऱ्या उमेदवारांना स्पष्टपणे नकार देणे आवश्यक आहे.

Crimenews /समाजाने आणि पालकांनी युवकांमध्ये व्यसनमुक्त जीवनाची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे.स्थानिक पातळीवर व्यसनमुक्ती केंद्रे, जनजागृती मोहीम, आणि तरुणांसाठी मार्गदर्शन शिबिरे यांची नितांत गरज आहे.

Urbannews/लोकप्रियतेसाठी वाढदिवस साजरा करणे झाली फॅशन…!कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री व स्वभल्यासाठी वापरतात जंत्री….!

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

बुलढाणा:-आज-काल वाढदिवसाची परंपरा चांगलीच दृढ होत आहे.खाजगी,सामाजिक, राजकीय,धार्मिक,शैक्षणिक व इतरही क्षेत्रात यांची चांगलीच दाटी पाहायला मिळते.परंतु यामध्ये अनेक लोक त्यांचा वाढदिवस साजरा करीत असताना स्वखर्चातून तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात संबंधित सामाजिक कार्यकर्ता व राजकीय क्षेत्रात संबंधित राजकीय नेता यांचे वाढदिवस कार्यकर्ते सादरी करत असतात.

परंतु अशी एक अर्थ संस्था आहे की जे विश्वातील सातही खंडात मान्यता प्राप्त आहे.आणि या अर्थसंस्थेचे अर्बन सह शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य आहे.म्हणून या संस्थेची उलाढाल ही अर्बोखर्बो मध्ये असते.या संस्थेत असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा अगणित आहे. विश्वातील सात खंडात असलेला सर्वात मोठा खंड आशिया खंड आहे.

या आशिया खंडातील नामवंत अशा संस्थेत,जेव्हा त्यांच्या आला चे वाढदिवस साजरे करतात तेव्हा कर्मचाऱ्यांच्या खिशाला कात्री लावल्या जाते.अशी संबंधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बोल्ड चर्चा दिसून येते. दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिमाह कमवणाऱ्या कर्मचाऱ्याला महिन्याचा घर खर्च भागवतांना किती धावपळ होत असेल अशातच वर्षाकाठी आला यांचे तीन ते चार वाढदिवस साजरे करावे लागतात. याची चांगलीच चर्चा कर्मचारी वर्गात दिसून येते.

तरी व्यवस्थापन मंडळ कर्मचाऱ्यांच्या या आर्थिक लुटीचा विचार करून त्यांच्या मानगट्टीवर करीत असलेले हे वाढदिवस बंद करेल काय ? कर्मचारी अधिनियमाच्या कलमामध्ये आणि कल्याणकारी योजना आहे काय?अशा प्रकारचे प्रश्न जनमानसात फिरत असताना दिसून येत आहे.

Banknews /स्वतःच्या लोकप्रियतेसाठी अन्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरणे हि कुठली प्रतिष्ठा आहे.त्यामुळे यावर आळा बसेल काय किंवा बसवणे गरजेचे नाही काय?

Yavalnews /बोराळे येथे उपसरपंचपदी मायाबाई कैलाससिंग राजपूत यांची बिनविरोध निवड

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

बोराळेः दि 16/20/2025 (ता. यावल ) येथील उपसरपंचपदी मायाबाई कैलाससिंग राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच दिपाली खीलचंद चौधरी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी मायाबाई कैलाससिंग राजपूत यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संध्याबाई उज्जैन संघ राजपूत होत्या. ग्रामसेवक निकेतन बिराडे यांनी सभेचे कामकाज पहिले. निवडीप्रसंगी मावळत्या उपसरपंच दिपाली चौधरी , ग्रामपंचायत सदस्या , उज्जैन सिंग राजपूत, उत्तम गौतमाबाई भिमराव वानखेडे , भरत राजपूत पितांबर चौधरी , भारतीय राजपूत ,

Yavalnews /संजय सिंग राजपूत कैलास सिंग राजपूत नितीन राजपूत, सुरेश सिंग राजपूत, धीरज पाटील, अमर वानखेडे ग्रामपंचायत शिपाई
कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Sivshenanews /सावली (वाघ) सर्कल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न!

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- दिनांक : १२ ऑक्टोबर २०२५, रविवार सावली (वाघ), हिंगणघाट तालुका
सावली (वाघ) सर्कल येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक माजी उद्योग राज्यमंत्री व माजी आमदार मा. अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे, तालुका प्रमुख मनीष देवढे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याबाबत सखोल चर्चा झाली. पक्षाच्या सूचनेनुसार तालुका पातळीवर अशा आढावा बैठका घेतल्या जात असून, सावली (वाघ) सर्कल ही पहिली बैठक ठरली.

पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण” या ब्रीदवाक्यानुसार काम करण्याचे आवाहन अशोक शिंदे यांनी केलं. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, त्यांना शक्य त्या मदतीसाठी शिवसैनिकांनी पुढे यावे, असंही त्यांनी सांगितलं.

Sivshenanews /यावेळी वाघसावली व नरसाळा गावातील ५० हून अधिक युवकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करत पक्षाला बळकटी दिली.
बैठकीस सर्कल प्रमुख निलेश मानकर, संजय रहाटे, घनश्याम येडे, गजानन सातारकर, करण जेणेकर, योगेश ठक, अशोक मुरकुटे आदी उपस्थित होते.

Crimenews /हिंगणघाटमध्ये मॅफेड्रॉनसह दोघे अटकेत – 1.93 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

 

हिंगणघाट :- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या कारवाईत दोन आरोपींना मॅफेड्रॉनसह अटक करण्यात आली असून एकूण ₹1,93,560/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पो.उपनि. हरीहर सोनकुसरे व त्यांच्या पथकातील अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे समजले की केतन कृष्णा देशपांडे (वय 20, रा. यशवंत नगर, हिंगणघाट) हा मॅफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत आहे. माहितीच्या आधारे, विशाल मॅगी पॉइंट, सर्व्हिस रोड, हिंगणघाट येथे सापळा रचण्यात आला.

त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांना थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
1. 10.13 ग्रॅम मॅफेड्रॉन (किंमत ₹18,560)
2. हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकल (MH-32-H-5791) – ₹20,000
3. Apple कंपनीचे दोन आयफोन – ₹1,55,000

 

एकूण जप्त मुद्देमाल: ₹1,93,560/-

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

केतन कृष्णा देशपांडे, वय 20, रा. यशवंत नगर, हिंगणघाट
प्रियांश रवी येणकोतकर, वय 19, रा. पोथरा कॉलनी, हिंगणघाट
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत खालील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते:policenews

Crimenews /पो.ह. अश्विन सुखदेवे, चेतन पिसे, राहुल साठे, सतीश घवघवे, उमेश लडके, रवी घाटुर्ले, अनंता हराळ, दीपक मस्के, भारत बुटलेकर, राकेश इतवारे, प्रशांत ठोंबरे, राजेश शेंडे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, रोहित साठे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि संगीता हेलोडे करीत आहे

Devendrafadnsvis/”फडणवीस पॅकेजवर होळी आंदोलन; शेतकरी संघटनेची ५० हजार हेक्टरी मदतीची मागणी”

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा (दि. १६ आक्टोबर २०२५):
राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेले ३१,६२८ कोटींचे शेतकरी पॅकेज म्हणजे आकड्यांची हेराफेरी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने करत, वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॅकेजच्या शासन निर्णयाची “होळी” करत तीव्र आंदोलन छेडले.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अॅड. वामन चटप, माजी आमदार सरोज काशीकर, मधुसूदन हरणे, शैला देशपांडे, उल्हास कोंटबकर व सतीश दाणी आदींनी केले.
शासनाने जाहीर केलेल्या मदतीत मागील वर्षीच्या तुलनेत हेक्टरी मदत कमी करण्यात आल्याचे सांगत, कोरडवाहू पिकांसाठी १३,६०० ऐवजी ८,५०० रुपये व बागायतीसाठी ३६,००० ऐवजी ३२,५०० रुपये दिले जात असल्याचा निषेध करण्यात आला.

केंद्र सरकारने आयात धोरण, निर्यातबंदी व वायदेबाजार बंदीमुळे शेतीमालाचे दर कोसळले असून, कडधान्य व कापसाच्या दरात मोठी घसरण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच, २०१८ मध्ये विहीर दुरुस्तीला मिळणारी १ लाख रुपयांची तरतूद या पॅकेजमध्ये फक्त ३०,००० रुपये करण्यात आली आहे, यावरही संताप व्यक्त झाला.

Devendrafadnsvis /शेतकरी संघटनेने हे पॅकेज शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे असून, “५०,००० रुपये हेक्टरी तातडीची मदत जाहीर करा” अशी स्पष्ट मागणी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत सादर करण्यात आली.
या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या समारोपात पिपरी पोहना, पानवाडी व सालोड हिरापूर येथील कार्यकर्त्यांच्या निधनाबद्दल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Yavalnews/यावल पंचायत समितीत दहिगाव गण या मतदारसंघातून पंचायत समिती साठी सौ. यशश्री देवकांत पाटील यांच्या उमेदवारीसाठी जनतेची जोरदार मागणी

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील दहिगाव गण हा महिला सर्वसाधारण आरक्षण असून परिसरात पंचायत समिती निवडणुकीची राजकीय तयारी सुरू झाली असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ. यशश्री देवकांत पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जनतेतून व कार्यकर्ते कडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

सौ. यशश्री देवकांत पाटील या सचिव – छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन, यावल तसेच मा. सदस्य – संजय गांधी निराधार समिती, यावल असून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.

फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजहिताचे अनेक उपक्रम राबवले, तर निराधार समितीच्या माध्यमातून गरीब, विधवा, अनाथ, ज्येष्ठ नागरिक व अपंग नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्या आहेत.

तालुकास्तरावर वैद्यकीय दाखले मिळावेत यासाठी , तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गरीब गरजू लोकांना व्हावा यासाठी तालुकास्तरावर विविध शिबिरांचे आयोजन करून च्या संदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
त्यांच्या कार्यात ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांचेही मोलाचे योगदान आहे. हे दाम्पत्य उच्चशिक्षित, प्रामाणिक व समाजाच्या सुखदुःखात सहभागी राहणारे कार्यकर्ते असून शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सामाजिक, राजकीय व अध्यात्मिक सर्वच क्षेत्रांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

लोकांच्या मनात आपुलकी, सेवाभाव आणि प्रामाणिक नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सौ. यशश्री देवकांत पाटील या दहिगाव गण येथून पंचायत समिती साठी सर्वात योग्य महिला उमेदवार ठरत आहेत, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व युवक वर्गात त्यांच्याबद्दल उत्साहाचे वातावरण असून, भविष्यात पक्षाकडून संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करून जनतेच्या विश्वासास पात्र ठरतील, असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या कार्याचा गौरव करत नागरिकांनी म्हटले आहे.

Yavalnews /की, “लोकहितासाठी समर्पित असलेली आणि विकासाचे स्वप्न सत्यात उतरवू शकणारी महिला म्हणजेच सौ. यशश्री देवकांत पाटील.” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अशा पात्र, जनसेवाभावी व लोकाभिमुख महिलेला संधी मिळावी हीच जनतेची अपेक्षा राहील उमेदवारीची संधी मिळाल्यास संधीचे सोने करून व सर्वसामान्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे या दांपत्याने विश्वास व्यक्त केला आहे.