Home Blog Page 13

Forestnews //सोनोशी पिंपरखेड मार्गावरील जंगलात अस्वल आढळला..

 

सोनोशी पिंपरखेड या जंगलाच्या परिसरामध्ये आज सकाळी साडेआठच्या दरम्यान काही सुनील जायभाये आणि शुभम वाघमारे कामानिमित्त रस्त्याने जात असताना त्यांना परमेश्वर मुंडे यांच्या शेतालगत अस्वल आढळून आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या गहू शाळु यासारखी पिके काढणे सुरू असताना व काही ठिकाणी शेतीची नागरटी सुरू असताना अस्वल दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच या जंगलामधून सतत दुचाकी चार चाकी इत्यादी वाहने मोठ्या प्रमाणात चालू असतात जंगलाच्या मधून जाणारा हा रोड थेट सिदंखेडराजा जातो.

त्यामुळे प्रवासी वाहतुकीलाही आता धोका निर्माण झाला आहे या रोडवर सतत वाहनाची ये जा सुरू असते त्यामुळे अस्वल आढळल्याने आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.Forestnews/

सध्या उन्हाचा पारा चढत आहे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था जंगलामध्ये नाही व इतरही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे वन्य प्राण्यांची अशी भटकंती होताना दिसत आहे.

Aswalnews/त्यामुळे वनविभागाने या बाबीकडे विशेष लक्ष देऊन अस्वलाचा शोध घेऊन त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे असे मागणी होत आहे

Crimenews /१७ वर्षांपासून शासकीय जागेचे भाडे थकीत असल्याचा आरोप; २० लाखांहून अधिक वसुली रखडल्याने खळबळ

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा : सिंदी (रेल्वे)
लघु पाटबंधारे विभाग येथील शासकीय वसाहत व कार्यालयीन जागेचे भाडे मागील तब्बल १७ ते १८ वर्षांपासून थकीत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या थकबाकीमुळे शासनाचे सुमारे २० लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर विठोबाजी वाघमारे यांनी मुख्य अभियंता, लघु पाटबंधारे विभाग (दक्षिण विभाग), नागपूर यांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे.
सन २००८ मध्ये पळसगाव (बाई) येथील एका संस्थेला सिंदी (रेल्वे) येथील लघु पाटबंधारे विभागाची वसाहत व कार्यालयीन जागा ३० वर्षांच्या करारावर देण्यात आली होती.wardhanews

वार्षिक अंदाजे ६८,८०० रुपये भाडे निश्चित असतानाही, पहिल्या वर्षानंतर कोणतेही भाडे भरले गेले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याच ठिकाणी शिष्यवृत्ती घोटाळ्याशी संबंधित तपास सुरू असताना काही कागदपत्रे जाळल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे. तसेच इमारतीतील दरवाजे व खिडक्या चोरीला गेल्याच्या घटनांवरही संशय व्यक्त करण्यात आला असून, याबाबत विभागाकडून कोणतीही ठोस नोंद नसल्याचा दावा करण्यात आला आहे.hingnghatnews

याशिवाय, संबंधित संस्थेच्या माध्यमातून बोगस संस्था स्थापन करून शिष्यवृत्ती निधीचा गैरवापर झाल्याचा तसेच त्या निधीतून शासकीय जमिनीच्या शेजारी खासगी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात शासकीय मालमत्तेचा गैरवापर, महसूल बुडवणे आणि संभाव्य आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून थकीत भाडे तात्काळ वसूल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.crimenews

Crimenews /दरम्यान, या प्रकरणाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक व संबंधित लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आली आहे.

Crimenews /हिंगणघाट परिसरात गांजाची वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, 1.55 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : अंमली पदार्थांच्या विरोधात वर्धा पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक केली. या कारवाईत सुमारे 1 लाख 55 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.hingnghatnews

वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे.

 

त्या अनुषंगाने 24 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, मुखबिरामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून जाम ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मौजा रिमडोह शिवारात, कोचर खरर्डा फॅक्टरीजवळ सापळा रचण्यात आला.wardhanews

यावेळी सुझुकी बर्गमन मोपेड (क्र. एमएच 32 ए.डब्ल्यू. 4877) वरून गांजाची वाहतूक करणारा आरोपी अब्दुल रिजवान उर्फ टोनी अब्दुल रज्जाक शेख (वय 30, रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट) याला रंगेहात पकडण्यात आले. आरोपीकडून 2 किलो 228 ग्रॅम गांजा तसेच मोपेड असा एकूण 1,55,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत सदर गांजा नागपूर येथील जावेद शेख (रा. ऑटोमॅटिक चौक, यशोधरा नगर) याच्याकडून पुरवठा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.hingnghatnews

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Crimenews /या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते तसेच कर्मचारी अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, दिनेश बोथकर व अभिषेक नाईक यांचा सहभाग होता.

Wardhanews /ऑडिटशिवायच संस्थांना मान्यता; वर्ध्यात भोंगळ कारभार उघड”

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा जिल्हा जिल्ह्यातील काही नोंदणीकृत संस्थांकडून 2017 नंतर लेखा परीक्षण (ऑडिट) करण्यात आले नसतानाही, अशा संस्थांना विविध शासकीय विभागांकडून मान्यता व प्राधान्य दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते सचिन वाघे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मिळवलेल्या प्रमाणित कागदपत्रांच्या आधारे हा प्रकार उघड केला आहे. त्यांच्या मते, अनेक संस्थांमध्ये दीर्घकाळ ऑडिट न झाल्याची बाब स्पष्ट असूनही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.hingnghatnews

दरम्यान, नियमांनुसार प्रत्येक नोंदणीकृत संस्थेस दरवर्षी लेखा परीक्षण करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून अशा संस्थांना विविध योजना, निधी व मान्यता दिली जात असल्याने हा गंभीर प्रकार मानला जात आहे.

“ऑडिट नसलेल्या संस्थांना मान्यता देण्याचे निकष काय?”, “संबंधित विभागांनी पडताळणी का केली नाही?” आणि “जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Wardhanews /या पार्श्वभूमीवर, सर्व संबंधित संस्थांची सखोल चौकशी करून विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिन वाघे यांनी केली आहे.

Nagarparishadnews /सिंदी नगर परिषदेत आंबेडकर जयंतीला शिष्टाचाराचा अवमान? मुख्याधिकारीसह कर्मचारी अनुपस्थित; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

सिंदी (रेल्वे)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शासकीय शिष्टाचाराचे पालन न झाल्याचा गंभीर आरोप सिंदी (रेल्वे) येथील नगर परिषद प्रशासनावर करण्यात आला आहे.

Wardhanews याप्रकरणी स्थानिक नागरिक सुधाकर विठोबाजी वाघमारे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून मुख्याधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी देशभरात संविधान निर्मात्यांना अभिवादन करण्यात येत असताना सिंदी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी पौर्णिमा गावित व अनेक कर्मचारी अनुपस्थित होते.hingnghatnews

शासकीय नियमानुसार अशा राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंतीदिनी प्रतिमा पूजन व अभिवादन करणे अपेक्षित असताना ते पार पडले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, नगर परिषदेचे काही लोकप्रतिनिधी शहरातील इतर ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित होते; मात्र प्रशासकीय प्रमुखांनी कार्यालयात उपस्थिती दर्शवली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब केवळ निष्काळजीपणा नसून हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.nagarparishadnews

या प्रकारामुळे संविधानाप्रती असलेल्या आदरभावाला धक्का बसल्याचे सांगत, दोषी अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच त्यांच्या सेवापुस्तकात नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ प्रशासन कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Wardhanews /१५ महिन्यांपासून चर्चा नाही; प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष — वर्ध्यात कर्मचारी बेमुदत संपावर

 

७ वेळा आंदोलन करूनही दखल नाही; जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी शिक्षक-कर्मचारी संतप्त

वर्धा (प्रतिनिधी सचिन वाघे ):

सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप करत २१ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यात बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे.hingnghatnews

समितीच्या वतीने सांगण्यात आले की, मागील १५ महिन्यांत सात वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्री स्तरावर चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या मागण्यांकडेही शासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी व शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.wardhanews

जुनी पेन्शन योजना (२००५ पूर्वीची) लागू करणे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, रिक्त पदे भरणे, आरोग्य विमा योजना लागू करणे तसेच विविध सेवाशर्तीतील प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागण्या प्रलंबित असल्याचे समितीने नमूद केले आहे. Tahsilnews

“प्रलंबित मागण्यांचे धोंगडे भिजत ठेवले जात असून कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव केला जात आहे,” असा आरोप समितीने केला आहे.

Tahsilnews /दरम्यान, “अभी नहीं तो कभी नहीं” असा नारा देत सर्व कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकजुटीने संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपामुळे शासकीय कार्यालये व शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Yavalnews /यावल व चोपडा उपजिल्हाप्रमुखपदी गोपाल चौधरी यांची निवड; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून मोठा विश्वास

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल (जि. जळगाव) – स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले गोपाल भाऊ चौधरी यांची यावल व चोपडा उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.breaking

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षाच्या वतीने करण्यात आलेली ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गोपाल भाऊ चौधरी यांनी यापूर्वीही विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे.udhhavthacry

 

त्यांच्या कार्यशैलीमुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास ठेवत ही जबाबदारी सोपवली असल्याचे बोलले जात आहे.

या निवडीबद्दल कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात येत असून, अनेकांनी सोशल मीडियावरूनही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावल व चोपडा तालुक्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच युवकांना संधी देण्यासाठी गोपाल भाऊ प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.jalgaon khandesh

आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना गोपाल भाऊ म्हणाले की, “पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन.

Yavalnews /येत्या काळात जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करणार असून, संघटन वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाईन.”
दरम्यान, त्यांच्या निवडीमुळे यावल व चोपडा परिसरात पक्ष संघटनाला नवे बळ मिळणार असून आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Crimenews /समुद्रपूर तालुक्यात गांजा विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; दोन आरोपी जेरबंद, 1.34 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश देण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर 18 एप्रिल रोजी हिंगणघाट उपविभागात गस्त घालत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजा कोरा येथे छापा टाकण्यात आला.hingnghatnews

या कारवाईदरम्यान कमलाकर चिंतामन वावधणे हा आरोपी गांजाची विक्री करताना रंगेहात पकडण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातून सुमारे 2 किलो 151 ग्रॅम गांजा, गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पॅशन प्रो मोटारसायकल (क्र. MH 32 AM 1627) तसेच मोबाईल असा एकूण 1 लाख 34 हजार 775 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.wardhanews

Tahsilnews /तहसीलदारांच्या आदेशालाही हरताळ? मंदिर ट्रस्टच्या इमारतीवर तोडफोड सुरूच – सुमित आहुजांचा आरोप

या प्रकरणात आरोपीला गांजा पुरवठा करणारा शेख अलीम शेख रमजान (रा. आदर्श नगर, नागपूर) याचाही समावेश असून, दोघांविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Crimenews /ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Tahsilnews /तहसीलदारांच्या आदेशालाही हरताळ? मंदिर ट्रस्टच्या इमारतीवर तोडफोड सुरूच – सुमित आहुजांचा आरोप

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील जगन्नाथ व जगदीश मंदिर ट्रस्ट प्रकरणाला नवे वळण लागले असून महसूल विभागाच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित मालमत्तेवरील इमारतीची तोडफोड सुरू असल्याचा गंभीर आरोप अर्जदार सुमित आहुजा यांनी केला आहे.hingnghatnews

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदारांनी या प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत मंदिर ट्रस्टशी संबंधित कोणतेही बांधकाम, व्यवहार किंवा मालमत्तेवरील हस्तक्षेप पूर्णपणे थांबवण्याचे आदेश दिले होते.crimenews

 

मात्र, प्रत्यक्षात या आदेशाचे पालन होत नसून संबंधित ठिकाणी तोडफोड सुरू असल्याचे समोर आले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना सुमित आहुजा म्हणाले, “तहसीलदारांचा स्पष्ट आदेश असतानाही मंदिराची संपत्ती असलेल्या इमारतीवर तोडफोड सुरू आहे. हे प्रशासनाच्या आदेशांचे सरळ उल्लंघन आहे.”

त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.wardhanews

दरम्यान, या घटनेमुळे हिंगणघाट शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित काम त्वरित थांबवावे आणि आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.brekingfast

सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून जगन्नाथ मंदिराची नोंदणी चुकून झाल्याचे सांगण्यात आले असून त्यावर आधारित फेरफार करण्यात आला. मात्र, जुन्या कागदपत्रांमध्ये मंदिर देवस्थानाचा स्पष्ट उल्लेख आढळून येत असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, ज्या मंदिराच्या नावावरून ‘जगन्नाथ वार्ड’ हे नाव पडले, त्याच मंदिराची नोंद कागदपत्रातून हटविण्यात आल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.

Policenews /सध्या या प्रकरणातील अंतिम चौकशी अहवाल आणि प्रशासनाकडून होणाऱ्या पुढील कारवाईकडे हिंगणघाटवासियांचे लक्ष लागले आहे.

पळशी झाशी च्या सरपंचा सकाळ गौरवगाथा च्या मानकरी नागपूर येथे सुप्रसिद्ध अभिनेते मा.सचिन खेडेकर यांच्या हस्ते सन्मानित.palshijhashi 

 

दिनांक 18 एप्रिल रोजी हॉटेल सेंटर पॉईंट नागपूर येथे आयोजित सरपंच कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळ्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामधील संग्रामपूर तालुक्यामधील विविध पुरस्कार प्राप्त आदर्श महिला सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांना सुप्रसिद्ध अभिनेते मा. श्री.सचिन खेडेकर, नागपूर जिल्हा परिषद सीईओ मा. श्री. विनायक महामुनी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.grampanchayat

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळ गौरव गाथा या पुस्तकाचे विमोचन वरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. SangrampurNews

आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे यांनी गावातील प्रत्येक घटकाला दिलेल्या न्यायाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी सुद्धा त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.rahulmetange

त्यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य नागरिकांच्या गरजा, विज, पाणी पुरवठा यांचे योग्य नियोजन, गावातील अपंग व्यक्ती,शाळा, अंगणवाडी, कर्मचाऱ्यांबद्दल असलेली आपुलकी व त्यांचे केलेले नियमित पगार, गावात विविध शिबिर घेऊन नागरिकांना सर्वच गरजा पूर्ण केले आहेत, वेळोवेळी महिलांचे मेळावा घेऊन त्यांच्या सर्व समस्या ऐकून त्या सोडवण्याचा केलेले प्रयत्न, गावात स्मशानभूमी नाली बांधकाम सांडपाणी व्यवस्थापन, सिमेंट काँक्रिटीकरण, जनावरांविषयी असलेली आपुलकी, जनावरांसाठी घेतलेले विविध कॅम्प, गावातील शेतकऱ्यांसाठी विविध कॅम्प, गावातील व्यायाम शाळा, वाचनालय, यासाठी असलेले योगदान, यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला असून या सर्वच गोष्टींच्या आधारावर त्यांना आज सन्मानित करण्यात आले आहे.

Grampanchayat /आज मिळालेला पुरस्कार गावकऱ्यांचेरणी अर्पण, गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आज गावात केलेल्या विकास कामांबद्दल मिळालेला पुरस्कार म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे,

Breakingnews /७९ वर्षीय वृद्धाच्या घरात घुसून कर्मचाऱ्यांची मुजोरी? बुरकोणी ग्रामपंचायतीविरोधात शंकर आष्टनकर यांचे BDO कडे प्रथम अपील

सदर विकास कामात नेहमी सहकार्य करणारे संग्रामपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव पायघन, गावाच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असलेले सचिव हेमंत देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर, व गावकरी मंडळी या सर्वांमुळे हा पुरस्कार मिळाला.
सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे)