Home Blog Page 185

मलकापुर शहर पोलीसांनी मोठी कारवाई गांजा सह आरोपी अटक गांजा केला जात

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

आज 12/08/2023 रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी पोस्टे मलकापुर शहर यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, एक इसम त्याचे ताब्यातील पांढन्या रंगाच्या सुझुकी कार क्रमांक ए.पी. 35 एस-2347 मध्ये मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणारा गांजा अमली पदार्थ राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 वरील खामगांवकडुन मलकापुरकडे घेवुन जाणार असल्याची बातमी मिळाली.

मिळालेल्या माहितीवरून ठाणेदार रत्नपारखी यांच्यासह नापोकों/ 1323 पंजाबराव शेळके डिवी पथकाचे सपोनि. के.पी तायडे पोकों/ 311 आसिफ शेख, पोकॉ/994 प्रमोद राठोड, पोकॉ/2312 ईश्वर वाघ, पोकॉ/25 गोपाल तारुळकर, पोकॉ/2732 प्रविण गवई, पोकॉ/1254 आनंद माने, पोकों / 2313 गोपाल इंगळे, पोकों/ 898 मंगेश चरखे

पोस्टे मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी व पोस्टे स्टॉप राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 वरील खामगांव व मलकापुर रोडवरील कन्हैय्या हॉटेलच्या बाजुला पोहचुन सापळा रचला बातमीतील नमुद वाहनाचा शोध घेत असतांना सदर वाहण कन्हैय्या हॉटेल च्या परिसरात पार्क केलेली दिसली व त्यातील दोन इसम सदर वाहणाच्या पाठीमागे उभे होते त्यांनी आम्हा पोलीसांना पाहून पळ काढला असता त्यातील एक इसमांस आम्ही जागीच पकडले त्यांचे नाव गाव विचारले असता,

त्याने त्याचे नाव अजयकुमार नित्यानंद भत्रा वय 26 वर्ष रा. आरएससी- 14 धारागुडा जि. मलकानगिरी राज्य ओडीसा असे सांगितले वरुन त्यांचे कडुन 69 किलो 900 ग्रॅम प्रति किलो किंमत 12,000/- एकुण एकुण 8,26,800/- रुपयांचा गांजा व एक सुझुकी कंपणीची कार क्रमांक ए.पी-35 एस-2347 किंमत अंदाजे 5,00,000/- रुपये असा एकुण 13,26,800/- रुपयांचा मुददेमाल मिळुन आल्याने पोस्टे मलकापुर 419/203 कलम 8 (क), 20 (ब), (ii), (ब) एनडीपीएस अॅक्ट व प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील पोस्टे मलकापुरचे पोनि अशोक रत्नपारखी करीत आहोत.

सदरची कार्यवाही व तपास मा. सुनिल कडासने साहेब पोलीस अधिक्षक बुलडाणा, मा. अशोक थोरात साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक खामगांव, मा. देवराव गवळी साहेब उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर व पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी सा पोस्टे मलकापुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर पोलीस स्टेशनचे डिबी पथकाचे सपोनि. के.पी तायडे पोकों/311 आसिफ शेख, पोकों/ 994 प्रमोद राठोड, पोकॉ/2312 ईश्वर वाघ, पोकॉ/25 गोपाल तारुळकर, पोकों/ 2732 प्रविण गवई, पोकों/ 1254 आनंद माने, पोकों / 2313 गोपाल इंगळे, पोकॉ/898 मंगेश चरखे व पोकॉ/१०१३ संतोष कुमावत यांनी केली आहे.

यावल महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा.

0

प्रतिनिधी ( यावल)विकी वानखेडे

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला‌.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा.एम. डी. खैरनार, प्रा. संजय पाटील उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. सुभाष कामडी यांनी यांनी आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती देताना आदिवासी संस्कृतीचे जतन संवर्धन, आदिवासींचे अधिकार, निसर्ग जाणीव, पर्यावरणाचे रक्षण विषयक टिकून राहिलेली अस्मिता, स्वातंत्र्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान, शासकीय योजना, आदिवासी साहित्या माहिती दिली.

महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदिवासी दिन व क्रांती दिन हे महत्त्वाचे दिवस आहेत हे सांगताना त्यांनी महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध यांनी ९ ऑगस्ट १९४२ साली मुंबईतून चलेजाव चळवळ सुरू केली होती. याची आठवण करून दिली आदिवासी समाज हा पुर्वीपासून डोंगराळ भागात राहणारा निसर्गपुजक आहे

त्यांचे रितीरिवाज, भाषाशैली इतर समाजाहून वेगळी आहे त्यांच्या संस्कृतीला वैभवशाली इतिहास लाभला आहे.एकलव्य आणि क्रांतिकारक बिरसा मुंडा हे आदिवासींचे प्रेरणास्थान आहे असे विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक. प्रा. छात्रसिंग वसावे यांनी केले.

तर आभार उपप्राचार्य प्रा. एम. डी .खैरनार यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला प्रा. डॉ.पी. व्ही. पावरा, प्रा.डॉ. सुधीर कापडे,प्रा. डॉ. हेमंत भंगाळे, प्रा.एस.आर. गायकवाड, प्रा.डॉ. आर. डी. पवार, प्रा. मनोज पाटील,प्रा. सी. के.पाटील , प्रा. एकनाथ सावकारे, प्रा.अरुण सोनवणे, प्रा मुकेश येवले प्रा.राजु तडवी उपस्थित होते. तर प्रा. डॉ. संतोष जाधव,प्रा. नंदकुमार बोदडे, प्रा.मिलिंद मोरे, प्रा. प्रशांत मोरे , प्रा. अर्जुन गाढे, प्रा. डॉ. निर्मला पवार, प्रा.डॉ. वैशाली कोष्टी, प्रा.ईश्वर पाटील, संतोष ठाकूर, मिलिंद बोरघडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

घाट बोरी येथील वन विभागाचया रोपवन लागवडीच्या भ्रष्टचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर निलंबन ची कारवाई करा!,,, अन्यथा आंदोलनचा इशारा!!,

0

 

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे वतीने उप वन संरक्षक बुलडाणा यांना निवेदन सादर,,!!

जिगाव प्रकल्प अंतर्गत स्टेट कॅम्प योजनेच्या निधीचया भरश्टा चारची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करा,!!,

 

आझाद हिंद शेतकरी संघटनेचया वतीने शेख सईद शेख कदिर यांनी आज दिनांक 11ऑगस्ट 2023 रोजी उपवन संरक्षक बुलढाणा यांना निवेदन दिले निवेदन नमूद केले की वनपरिक्षेत्र घाटबोरी अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव सकर्शा येथील शासकीय जमिनीवर जिगव प्रकलप स्टेट कम्पा योजने अंतर्गत झालेल्या रोपवन लागवडीच्या नावाखाली भ्रष्ट अधिकाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला असल्याचे नमूद केले, संबंधित अधिकाऱ्यांक्या अर्थपूर्ण सहकार्याने शासकीय जमिनीवर तलावातून शेकडो वाहने मुरूम, माती,रेती, चे अवैधरीत्या उत्खनन करून व परिसरात मोठ मोठे रस्ते बनवून रेती साठा गोळा करून वाहतूक केली जाते,

शेकडो हेक्टर शासकीय तथा वन जमिनीवर रोप वन लागवडी करिता मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला रोप लागवडीचे नावाखाली व वृक्ष लागवडीच्या नावावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी चा संबंधित अधिकारी यांनी भ्रष्ट चार केला, नावापुरतीच जमिनीवर वृक्ष लागवड केली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांन हाताशी धरून निधी खरची केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले,रोपवन ल संरक्षण नसल्याने रोपवन मद्ये गुरे ढोरे चारत असून रोपवन हे पूर्णपणे उध्वस्त झालेले आहे,

भ्रष्ट अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची तसेच लागवडीच्या भराष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची तसेच फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आझाद हिंद संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शेख सईद शेख कदिर यांनी उप वन संरक्षक बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनातून केली.

मागणी पूर्ण न झाल्यास 15 दिवसानंतर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला त्यावेळेस आझाद हिंद संघटनेच जळगाव जामोद तालुका अध्यक्ष शेख रसूल भाई तसेच आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष शेख अझरभाई पत्रकार राजेंद्र ससाने यांची उपस्थिती होती निवेदनाच्या प्रती वन मंत्री मुंबई,जिल्हा अधिकारी बुलडाणा,अड सतीशचंद्र रोठे,बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ यांना देण्यात आल्या,

अभयसिंह मारोडे यांच्या उपोषणाला आजाद हिंद शेतकरी संघटने चा जाहीर पाठिंबा – मा.कलीम शेख

0

 

 

दि.9 ऑगस्ट बुधवारी क्रांतीदिनी बेरोजगार शिक्षकांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तहसील संग्रामपूर येथे उपोषणाला बसले आहे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

आणि संग्रामपूरचे तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ उपोषणाची दखल घ्या आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या थांबवून नवीन बेरोजगार शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत या विषयावर निवेदन देण्यात आले.

त्यावेळी आजाद हिंद शेतकरी संघटने चे तालुका अध्यक्ष शेख कलीम व शेख वसीम तंटामुक्ती अध्यक्ष मुफ्ती समि हाजी शफियोदींन सबीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती…

अब होगा न्याय
बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याचं पाहिजेत
आजद हिंद शेतकरी संघटना महाराष्ट्र

 

डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांना “युवकांची राजकारणात सकारात्मकता वाढविण्यासाठी समाज माध्यमाची भूमिका”विषयावर पीएचडी प्रदान

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगावः पुष्करणा ब्राह्मण समाजातील प्रगल्भ बुद्धीच्या असलेल्या छत्तीसगड की बेटी म्हणून प्रख्यात डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांना युवकांची राजकारणात सकारात्मकता वाढविण्यासाठी समाज माध्यमांची भुमिका एक विश्लेषण, मुल्याकंन या विषयावर डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

सदर पीएचडी डॉ. सुभाष चंद्राकर यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केली. राष्ट्रपती पदकाव्दारे सन्मानित डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांनी समाजमाध्यमाव्दारे युवापिढी राजकारणात सशक्त अशंतः व गुणात्मक दोन्ही बाजूंचे सविस्तर विश्लेषण केले आहे. देशात अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन आहे. कर्मवीर चक्र प्राप्त डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांच्या अध्यायनातुन युवकांची राजकारणातील भुमिका प्रभावी ठरणार आहे.

प्रियंका व्यास बिस्सा ह्या शेगांव येथील हिंदू महासभेचे दिवंगत राष्ट्रीय नेते शालीग्रामजी जोशी यांची नात असून अकोल्याचे प्रख्यात अभियंते राजेश रामकिसन व्यास यांच्या स्नुषा आहेत.

प्रियंका बिस्सा यांना पीएचडी मिळाल्याने पुष्करणा ब्राह्मण समाजा मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असून समाज बांधवांनी एकमेकांना पेढे खाऊ घालून आनंद साजरा केला तसेच खामगाव अकोला शेगाव तेल्हारा इत्यादी ठिकाणच्या समाज बांधवांनी तसेच श्रीमती सरस्वती व्यास, सौ. शिलादेवी व्यास, . राजेश व्यास, देवेश व्यास देविका व्यास यांच्यासह व्यास परिवारातील अन्य मान्यवरांनी प्रियंका बिसा व्यास यांचे अभिनंदन कौतुक केले आहे.

शेगांव ग्रामीण पोलिसांचा वरली जुगारवर छापा, ६ हजार रू चा मुद्देमाल जप्त

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.तालुक्यातील ग्राम तिंत्रव येथील सुरु असलेल्या वरली जुगार व अवैध दारू विक्रीवर ग्रामीण पोलीसांनी दि.९ ऑगस्ट रोजी दु.४.३० वा छापा मारला असता आरोपी कडुन ६ हजार १७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हकीकत अशा प्रकारे आहे की यातील नमुद घ ता वेळी व ठिकाणी यातील आरोपी याचेवर पंचासमक्ष – खबरेप्रमाणे जुगार व प्रोव्ही रेड केला असता आरोपीचे कब्जातुन आकडे लिहलेल्या कार्बनची १ नग कागदी मोठी चिठ्ठी कि. 00/- रु. वरली मटका जुगाराचे नगदी २८० रु एक नग डॉट पेन कि. ५/- रु. एक SAMSUNG कंपनीचा जुना वापरता मोबाईल हैंडसेट ज्याचा IMEI क्र. 350894211465341. ज्यामध्ये जिओ कंपनीच सिमकार्ड क्र. 8767833701 कि. अं. ५ हजार रुपये असा एकुण ५ हजार ,२८५ रुपयांचा जुगार माल तसेच घटनास्थळावरील थैलीची झडतीमध्ये आरोपीचे कब्जातून विनापरवाना ९० एम. एल. च्या एकुण २५ नग बॉटल प्रत्येकी कि ३५ रु प्रमाणे ८७५ रु ची दारु, एक नग वायरची थैली कि. १० रुपये, असा एकुण ८८५ रुपयाचा प्रोव्हीशन माल असा एकुण ६ हजार १७० रुपय जप्ती करुन ताब्यात घेतला

.या प्रकरणी सरतर्फे फिर्यादी पो.ना. सुधाकर प्रभाकर थोरात वय ३९ वर्ष नेमणुक मा. उप वि.पो. अ. सा. कार्यालय खामगांव यांनी दिलेल्या लेखी रिपोर्टवरुन शेगांव ग्रामीण पोलीसांनी आरोपी – विलास रामदास डोंगरे वर्ष ३२ वर्षे रा आडसुळ ह. मु. तित्रव ता. शेगांव जि. बुलढाणा याचे

विरुद्ध अप.नं १८१/२०२३ कलम १२(अ) मजुका,सह कलम ६५(ई) मदाका अन्वये सदरचा गुन्हा दाखल करुन तपास मा पो नी सा आदेशाने बीट पोहेका अरुण मेटांगे यांचेकडे देण्यात आला आहे

पंचायत समिती चामोर्शी येथे “मेरी माटी,मेरा देश” उपक्रम उत्साहात साजरा.

0

आमदार डॉ देवराव होळी यांच्या शुभहस्ते अनावरण.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:- पंचायत समिती चामोर्शीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विर जवानांनी आपल्या जीवाची बाजी लाऊन आम्हा सर्वांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले.त्यामुळे आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत.या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण देशात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अभियान मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे.त्या मधीलच एक महत्वपूर्ण भाग म्हणून “मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम दिनांक ९ आगस्ट रोजी साजरा करण्यात आला.
दरम्यान गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवराव होडी यांच्या शुभहस्ते शिलावरणाचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना शपथ देण्यात आले.पंचप्रण शपथ पुढीलप्रमाणे,
मी अशी शपथ घेतो की,विकसित भारताच्या विकासासाठी माझी भागीदारी प्रामाणिकपणे पार पाडीन,गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन.देशाच्या समृद्ध वारशावर अभिमान बाळगिन आणि देशाच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहीन,देशाच्या एकता आणि अखंडते साठी सदैव प्रयत्नशील राहीन.देशाप्रती माझे कर्तव्य आणि जबाबदारीचे मी पालन करीन.देशाच्या प्रतिष्ठेसाठी वीरांच्या कार्यावर प्रेरित होऊन देशाचे रक्षण,सन्मान,आणि प्रगतीसाठी समर्पित राहीन

जय हिंद कार्यक्रमाला पंचायत समिती चामोर्शीचे गट विकास अधिकारी सागर पाटील, सहायक गटविकास अधिकारी भिमराव व्यनखंडे, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, शिक्षण विस्तार अधिकारी नेताजी मेश्राम,यशवंत टेंभुर्णे, राजेश कोत्तावार,कृषी विस्तार

अधिकारी काळबांधे,केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,गट साधन केंद्र चामोर्शी येथील विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते, विवेक केमेकर,संसाधन शिक्षक रवी खेवले,दशरथ गहाणे,कु मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण,उमेश पोहाणे,शिक्षक वर्ग,पंचायत समिती चामोर्शी येथील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी,महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

किरकोळ सामान आणायचा आहे असे सांगून शेगाव बस स्थानक येथून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता, शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

भाची सोबत शेगाव बस स्टैंड वर आलेल्या 19 वर्षीय तरुणी किरकोळ सामान आनायला जाते असे सांगून निघून गेली ती बराच वेळ पर्यंत आली नाही त्यामुळे सदर माहिती तरुणीच्या भावांना देण्यात आली.

त्यावरून तरुणीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये हरविल्याची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गवई बकल नंबर 715 करीत आहेत

 

🔹

धावत्या रेल्वे समोर उडी मारून इसमेची आत्महत्या

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

धावत्या रेल्वे समोर उडी मारून इसमाने आत्महत्या केल्याची घटना ओळखली झाली आहे याबाबत रेल्वे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव नागझरी लोहमार्गावर खंबा किलोमीटर नंबर ५४७/२० या ठिकाणी रेल्वे समोर उडी मारून धनगर नगरातील इसमाने आत्महत्या केल्याप्रकरणी शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे .

याबाबत रेल्वे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव रेल्वे स्टेशनचे डेप्युटी स्टेशन मास्तर यांनी दिलेल्या मेमो मध्ये माहिती दिली की ट्रेन क्रमांक 12 844 च्या लोको पायलेट ने माहिती दिली की शेगाव नागझरी रेल्वे स्टेशनच्या मदत लोहमार्ग किलोमीटर नंबर ५४७/२० वर एका इसमाने गाडी समोर येऊन आत्महत्या केली.

याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलीस विभागातील आरक्षक समाधान गवई घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर प्रेताची पाहणी केली असता कमरेवर मार लागलेला दिसला सदर मृतकाची ओळख धनगर नगरातील हेमंत संभाजी खांडेकर 43 असल्याचे समजले या प्रकरणी शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी अधिक तपास शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ए एस आय लंकेश्वर करीत आहेत

२२ ऑगस्ट ला सिंदी नगरवासियांचा चक्का जाम आंदोलन

0

 

सिंदि रेल्वे घर टॅक्स वाढ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी प्रकरणात प्रशासनाने जी आश्वासने दिली ती पूर्ण न झाल्याने

;- सिंदी (रेल्वे) शहरांतील नगर पालिकेने घर करामध्ये अवाजवी कर वाढवलेला आहे. तो कर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह सिंदी रेल्वे येथील सर्व पक्षीय नेते, जनसामान्य नागरिकांनी न. पा. मुख्याधिकारी यांना वारंवार निवेदने दिली.

नगरपालिकेवर भर पावसात मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा सुद्धा काढला असता या मोर्चात मोठ्या प्रमाणात शहरातील अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना व सामान्य नागरिकांनसह रस्त्यावर उतरून नगर पालिका प्रशासनाला कर टॅक्स वाढ प्रकरणात जॉब विचारला असता मुख्याधिकार्यानी १५ ऑगस्ट पर्यंत टॅक्स कर वाढ कमी करून देऊ अशे सर्वांसमोर आश्वासन दिले परंतु आज अस लक्षात येते की प्रशासनाने सिंदी रेल्वे वासियानकडे पाठ फिरवली.

तसेच *कायमस्वरुपी मुख्याधिकारी नगर पालिकेला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांचाशी खासदार रामदास तडस, विधानसभा आमदार रामदास आंबटकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले तसेच सिंदी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी जिल्हाधिकाऱ्याशी त्यांचा दालनात चर्चा केली असता या चर्चेतून १५ दिवसामध्ये नगर पालिकेला मुख्याधिकारी मिळणार अशे आश्वासन देण्यात आले परंतु आता महिना होत आहे नाही मालमत्ता कर ही कमी झाला नाही

मुख्याधिकारी सुद्धा नगर परिषद ला मिळाले नाही अशे पोकळ आश्वासन देऊन सिंदी रेल्वे शहर वासी यांची दिशाभूल प्रशासनाकडून होत आहे.* करीता येणाऱ्या १५ तारखेच्या आत जर घर टॅक्स (कर) कमी झाला नाही तसेच कायमस्वरुपी मुख्याधिकारी न. पा. येथे रजू झाला नाही तर *दि २२- ऑगस्ट रोज मंगळवार ला सिंदी रेल्वे येथे सिंदी शहरातील नागरिकांसह चक्का जाम आंदोलन करणार असा इशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.*